Home ताज्या बातम्या देशभरातील दहा ऐतिहासिक स्मारकं सर्वसामान्य पर्यटकांसाठी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील:- प्रल्हाद सिंह...

देशभरातील दहा ऐतिहासिक स्मारकं सर्वसामान्य पर्यटकांसाठी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील:- प्रल्हाद सिंह पटेल

0


नवी दिल्ली, 30 जुलै 2019 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देशभरातील दहा ऐतिहासिक स्मारकं यापुढे सर्वसामान्यांसाठी सकाळी सूर्योदयापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत अशी घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केली. याआधी ही सर्व पर्यटनस्थळे सकाळी 9 ते संध्याकाळी साडे पाच या वेळेतच सुरु असायची. सर्वसामान्‍य नागरिक आणि बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांनाही निवांतपणे ही स्थळं बघता यावी यासाठी हा निर्णय घेतल्याचे पटेल यांनी सांगितले. या स्थळांमध्ये महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा मंदिरांचाही समावेश आहे.

10 ऐतिहासिक स्मारकांची नावे खालीलप्रमाणे:-

अनु.क्र.स्मारकाचे नावजिल्हाराज्य
1राजाराणी मंदीर परिसरभुवनेश्वरओदिशा
2दुल्हादेव मंदीर, खजुराहोछत्रपूरमध्य प्रदेश
3शेख चिली मकबरा, थानेसरकुरुक्षेत्रहरियाणा
4सफदरजंग मकबरादिल्लीदिल्ली
5हुमायुँ मकबरा, दिल्लीदिल्लीदिल्ली
6पत्तडीकल येथील स्मारकं, कर्नाटकभागलकोटकर्नाटक
7गोल घुमटविजयपूरकर्नाटक
8चार्मोशी येथील मार्कंडा मंदीरंगडचिरोलीमहाराष्ट्र
9मन महल, वैधशालावाराणसीउत्तर प्रदेश
10रानी-की-वावपाटणगुजरात
Previous articleमुस्लिम महिला (विवाहविषयक अधिकार संरक्षण) विधेयक 2019 संसदेत संमत, मुस्लिम महिलांची तिहेरी तलाकच्या अभिशापातून मुक्तता :- अमित शहा
Next articleभारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पाडावा: – विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − 11 =