रावेत,दि.१६ डिसेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- प्रभाग क्रमांक १६ रावेत येथे पहिल्यांदा भव्य फुलपीच टेनिस बॉल क्रिकेट मॅच भरवण्यात आल्या होत्या.युवा नेते भावी नगरसेवक दिपक मधुकर भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त डिसेंबर १४ व १५ रोजी ह्या मॅच घेण्यात आल्या व अभिष्टचिंतन सोहळा समीर लॉन्स, रावेत येथे दि: १४ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाला दिपक भोंडवे यांचा केक कापुन मोठ्या उत्साहात वाढदिवस संपन्न झाला,यावेळी आमदार शंकर जगताप यांनी दिपक भोंडवे यांना केक भरवत शुभेच्छा व्यक्त केल्या बेलताना म्हणाले, दिपक भोंडवे नी प्रभागात चांगले काम करीत आहेत,त्यांचा जनादार वाढताना पाहुन आनंद होत आहे,ते लवकरच महापालिकेच्या सभागृहात जातीलच आपण सर्वच जनता अशीत साथ द्याल.
रावेत मध्ये पहिल्यांदा भव्य फुलपीच टेनिस बॉल लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. एकूण २२ टीम ने या स्पर्धेत सहभाग घेतला. सदर स्पर्धे दरम्यान आकर्षक रोख रक्कम बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.सर्व खेळाडुंना प्रोत्साहन देण्याकरिता ही स्पर्धा भरवण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन तसेच बक्षीस वितरण चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार शंकर पांडुरंग जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक नामदेव ढाके भाजपा गटनेते,मा.नगरसेवक सचिन चिंचवडे,रावेत-किवळे भाजपा मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे व इतर मान्यवर ही उपस्थित होते.
संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंमध्ये मोठा उत्साह दिसून आला. क्रिकेटचा लुप्त उचलण्यासाठी क्रिकेट प्रेमींनीही या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नम्रता गलोरिया हाऊसिंग सोसायटी यांनी पटकावला, दुसरा स्थान एक्वामरीना हाउसिंग सोसायटी, तृतीय स्थान सिल्वर लँड फेज एक, चौथा स्थान सेरेनिटी स्पार्टंट. स्पर्धेच्या मालिकावीर आणि बेस्ट बॅट्समन पुरस्कार नम्रता गुलोरिया चे प्रणील मिस्त्री यांना मिळाला. तसेच बेस्ट बॉलर चा मान कुशल खोडके एक्वा मरीना यांना मिळाला.. त्याचप्रमाणे महिला सामन्यांमध्ये कोमल सैनी , सिल्वर गार्नियर यांनी उत्तम कामगिरी करत महिला उत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला. या कार्यक्रमाचे व स्पर्धेच्या नियोजनासाठी दीपक मधुकर भोंडवे मित्रपरिवार, संतोष भोंडवे, सुनील भोंडवे, अजय भोंडवे, आणि श्री वैभव देशमुख जी के सिल्वरलँड फेस तीन टिमने महत्त्वाची भूमिका बजावली व अथक परिश्रम घेतले. दिपक भोंडवे यांनी सर्व खेळाडूंची आभार मानत सर्वांनी दाखवलेला उत्साह आणि स्पोर्ट्समन स्पिरिट कौतुक केले.