Home ताज्या बातम्या दिघी येथे माजी सैनिक मेळाव्यात आ. महेश लांडगे यांना एक मुखी पाठिंबा

दिघी येथे माजी सैनिक मेळाव्यात आ. महेश लांडगे यांना एक मुखी पाठिंबा

0

दिघी, दि. दि.१ नोव्हेंबर२०२४ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-देव, देश आणि धर्मासाठी पुढाकार घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी नतमस्तक व्हावे ही माझी भूमिका आहे. दिघीगाव आणि या परिसरात राहणाऱ्या माजी सैनिकांनी देशासाठी केलेल्या त्यागाची कशाचीच तुलना होऊ शकत नाही. त्यांचा त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा सर्व देशवासियांना सार्थ अभिमान आहे. देशसेवेसोबतच लोकशाही बळकट व्हावी याकरिता सैनिक बांधवांनी पुढाकार घ्यावा, मला कायम माजी सैनिकांच्या ऋणात रहायला आवडेल असे प्रतिपादन भोसरी मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय आठवले गट महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी केले.

देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांचा ‘माजी सैनिक मेळावा’ दिघी येथे नुकताच पार पडला. यावेळी माजी सैनिक विकास संघ दिघी अध्यक्ष नरेंद्र सिंह चौहान, माजी सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष आमसिद्ध भिसे, माजी नगरसेवक विकास डोळस, कमांडर नंदा, कॅप्टन सावंत, परिसरातील पाचशेहून अधिक आजी-माजी सैनिक तसेच त्यांचे परिवारातील बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. यावेळी माजी सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

   तन-मन धन अर्पण करत सैनिक देशाची सेवा बजावतात. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन या शहराला देखील सुजलाम् – सुफलाम्  करणार आहे. शहर विकासाचे ‘व्हिजन’ डोळ्यासमोर ठेवताना माजी सैनिकांचा आदर्श मी समोर ठेवतो.  असेही आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
    माजी सैनिक विकास संघ दिघी अध्यक्ष नरेंद्र सिंह चौहान म्हणाले की, माजी सैनिक म्हणून आम्हाला मिळणारा सन्मान, आम्ही ज्या ठिकाणी वास्तव्याला आहोत, त्या दिघी परिसराचा केलेला कायापालट आणि आमच्या बाबत नेहमीच आस्थेवाइकपणाने होणारी विचारपुस या सर्व गोष्टींमुळे आम्ही नेहमीच आमदार महेशदादा लांडगे यांच्या पाठीशी आहोत, अशा शब्दात चौहान यांनी माजी सैनिकांच्या भावना व्यक्त केल्या.
Previous articleचर्चा फक्त घोड्यावरच्या उमेदवाराची, कोण आहे उमेदवार
Next articleचिंचवड मतदार संघात सर्वाधिक तर मावळमध्ये सर्वात कमी दिव्यांग मतदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × three =