Home ताज्या बातम्या १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पिंपरी चिंचवड शहरात साजरा होणार धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव

१४ ऑक्टोबर २०२४ रोजी पिंपरी चिंचवड शहरात साजरा होणार धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव

0

पिंपरी,दि.०५ ऑक्टोबर २०२४( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-धम्मचक्र प्रवर्तन दिन किंवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी आणि/किंवा १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो.त्याच अनुषगांने दरवर्षी पिंपरी चिंचवड शहरात भीमसृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात साजरा केला जातो.
सोमवार दि. १४/१०/२०२४ रोजी सायंकाळी ५ वा. स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मागील मैदान, पिंपरी. येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे यंदाचे १४ वे वर्ष असून धम्मचक्र प्रवर्तन दिन हा मोठ्या उत्साहात साजरा आपण करीत आहोत.धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव समिती २०२४ पिंपरी चिंचवड शहर आयोजीत यादे १४ ऑक्टोबर १९५६ की  बुद्ध की राह पर”  बुद्ध भिम गितांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रम सादरी करण कव्वाल मुजताबा अजीज नाजा,शाहिर मीराताई उमप,गायक सचिन भुईगळ यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल.कार्यक्रमाची सुरवातीस बुद्ध वंदना,व पं.पुज्य भन्ते राजरन्तजी यांची धम्मदेसना व कार्यक्रमाची प्रस्तावना व बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल.अशी माहिती धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव समितीचे विकास कडलक यांनी दिली.सर्वानी कार्यक्रमास हजोरोच्या संख्येने उपस्थित राहवे असे अहवान देखील केले.या कार्यक्रमाचे आयोजननितीन गवळी,विनय बोरकर,अमोल धावारे,विजय ओहळ,सागर घनवट,प्रकाश बक्तर,अनिकेत गायकवाड,विकास कडलक,अजय देहाडे,राम भंडारे,आकाश लगाडे,बुद्धभुषण गवळी,सुरेश खरात,किसन आलेगांवकर,विजय शिंदे,गणेश आळेगांवकर,संतोष सुरवसे,अमोल डंबाळे,सचिन थोरात,बाळासाहेब साळवे,अण्णासाहेब ओव्हाळ,राजेंद्र कांबळे धम्मचक्र महोत्सव समीतीने केले आहे.

Previous articleराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मावळसाठी 44 कोटींचा निधी
Next articleशरदचंद्र पवार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे घंटानाद आंदोलन,शिक्षण वाचवण्यासाठी सरकार बदलण्याचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + 8 =