Home ताज्या बातम्या चिंचवड विधानसभेत महायुतीत गडबड,बंडाचा एल्गार कोण लढणार चिंचवड विधान सभा?,

चिंचवड विधानसभेत महायुतीत गडबड,बंडाचा एल्गार कोण लढणार चिंचवड विधान सभा?,

0

चिचवड,दि.२५ सप्टेंबर २०२४ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी ):-प्रशांत शितोळे,मयूर कलाटे,मोरेश्वर भोंडवे,विनोद नढे या चार नगरसेवकांनी पञकार परिषद घेऊन बंडाचा एल्गार करणार असल्याचे सांगितले.भाजप सोबत अजितदादा पवार यांनी युती केल्याने महायुतीची ताकद वाढली पण अजितदादांच्या कार्यकर्त्याना न्याय मिळत नसल्याने चिंचवड विधानसभेत बंडाची घडी पडल्याचे दिसते लवकरच काही नगरसेवक महायुती मधील सोबत आहेत सर्वाची बैठक घेत संगनमताने नवखा चेहरा चिंचवड विधान सभेत दिसेल व लवकरच तो जाहिर केला जाईल.

चिंचवड विधान सभेत भाजप च काम करणार नाही असे चारही नगरसेवकांनी पञकार परिषदेत सांगितले,पर्यायी तयारीत अडचण आल्यास २००९ साला प्रमाणे पुन्हा एकदा चिंचवड विधानसभेला अपक्ष आमदार पहावयास मिळेल असे मोरेश्वर भोंडवे म्हणाले.काही दिवसात चेहरा जाहीर होईल.महायुतीत काहीस जमना व काही नगरसेवकांची कुचबंना होत आहे.त्यामुळे बंडाचा झेडा लवकरच फडकणार असे चिन्ह माञ आजच्या पञकार परिषदेतुन जाहिर झाले.येणारी विधानसभा निवडणुकीत कुरघोड्या मतदारांना पहायला मिळणार त्यामुळे शहरात कोण पहिले कुरघोडी करणार या कडे संपुर्ण शहराचे लक्ष लागुन आहे.

Previous articleनिळ्यापूररेषीतील २७ अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर महापालिकेची कारवाई
Next articleवांद्रे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा ! आंबेडकरी जनतेच्या २४ वर्षांच्या संघर्षानंतर मागणी पूर्ण….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − 12 =