किवळे,दि.२३ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- रस्ता, पाणी आणि वीज या तीन मूलभूत गोष्टीची गरज असून त्यांच्या या मूलभूत गरजा लवकर पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे,असे धर्मपाल तंतरपाळे व राजेंद्र तरस यांनी प्रजेचा विकास शी बोलताना सांगितले.
धरणे आंदोलन, रस्ता रोको, अमरण उपोषण, वेळपडल्यास सामुहिक आत्मदहनचा इशारा, तसेच २३ कुटुंब घराला कुलुप लावुन घर सोडून रस्त्यावर चुल मांडणार,रस्ता मिळेपर्यंत परत घरी जाणार नाहीत अंदोलक,मुकाई चौक रिक्षा स्टॅन्ड जवळ किवळे या ठिकाणी अंदोलन आज पासुन सुरु.महानगरपालिका हद्दीतील किवळे सर्व्हे नं. ७५/२ व माळवाले नगर येथील २३ कुटुंबाचा जाण्यायेण्याचा रस्ता मा. उत्तभ रामचंद्र तरस व त्यांच्या परिवाराने अडविला आहे. तो खुला करणे संदर्भात. फुले शाहू आंबेडकर विचार संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे मंच व राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन यांच्यावतीने बेमुदत धरणे अंदोलन पुकारण्यात आले.
सर्व्हे नं. ७५/व माळवाले नगर किवळे येथे गेली ४० वर्षापासून २३ कुटुंब सुमारे ३५० लोक राहतात. त्यांच्या खरेदीखतावर १० फुटी रस्ता आहे. तसेच नगर रचना विभागाच्या नकाशामध्ये तो रस्ता दिसतो. या २३ कुटुंबाने श्री. उत्तम रामचंद्र तरस व त्यांच्या वडिलांकडुन जागा खरेदी केली आहे. या रस्त्यावर महानगरपालिकेने ड्रेनेज, गटार, स्ट्रीट लाईट इत्यादी कामे केली आहे. परंतु उत्तम रामचंद्र तरस खाजगी जागा सांगुन रस्ता देत नाही. पुर्वी जमिनीला भाव कमी होता, परंतु आता जमिनीला भाव आल्यामुळे ते जमीन जे.बी. ला म्हणजे भागीदारी तत्वावर देण्यासाठी मागतात तरच रस्ता देऊ असे सांगतात.तेथील लोकांची परस्थिती खुपच खराब आहे. आजारी पडले तर साधी रिक्षा पण येत नाही.झोळी करुन लोकांना घेऊन जावे लागते. गटाराचे पाणी रस्त्यावर आहे. कचरा गाडी येत नाही. स्वच्छता नाही. त्यामुळे संपुर्ण कुटुंबाचे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे २३ कुटुबांनी मुलाबाळासहीत घर सोडून रस्त्यावर राहण्याचा निर्णय घेतला आहे. जो पर्यंत रस्ता मिळत नाही. तो पर्यंत घरी जाणार नाही अशी भुमीका घेतली आहे.व पवना नदीत सार्वजनिक अत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मंगळवार दि.२३/०७/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता धर्मपाल तंतरपाळे व राजेंद्र तरस यांच्या नेतृत्वाखाली २३ कुटूंब सुमारे ३५० लोक आंदोलनास बसलेआहोत, होणाऱ्या परिणामास श्री. उत्तम रामचंद्र तरस व त्यांच्या परिवार जबाबदार राहील. असे अंदोलन कर्ते धर्मपाल तंतरपाळे यांनी सांगितले.नागरिकांना रस्ता मिळणार का की पुन्हा उडवाउडवी होणार या कडे संपुर्ण शहराचे लक्ष लागुन आहे.नागरिकांच्या जीवाशी चालवलेला थांबणार का? जागा विक्री केल्याने जागा मालकाचे चुकच्या धोरणाना कोण बळ देतय अशी वार्ता संपुर्ण परिसरात पसरली आहे.
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, विजय घारे उपाभियंता नगर रचना महेश बरीदे उपअभियंता बांधकाम विभाग यांनी आंदोलन स्थळी भेट दिली व वरिष्ठांशी चर्चा करून कळवतो असे सांगितले.यावेळी विनोद भंडारी,दत्तात्रय गायकवाड,निलेश तरस, नंदकुमार पवार,अशिष धावारे, स्वाती किरण शेडगे, रूपाली संदीप भालेराव, सुनिता संदीप इंगळे, स्मिता विकास भालेराव, राधा अशोक धावरे,पल्लवी विजय जाधव,सविता राजेश जाधव, निखिल तांबोळी, मीनाज तांबोळी,अलिशा मुबारक तांबोळी, मीना सनातन जगदाने, मंगल न्यानोबा जाधव, संदीप भालेराव आदी. पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनकर्ते देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.