Home ताज्या बातम्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांना ५ लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांना ५ लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार

0

नवी मुंबई,दि.१६ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-डोंबिवली (घेसरगाव) येथून खाजगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दि. १५ जुलै रोजी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातातील मृत व्यक्तींना शासनातर्फे ५ लाख रुपये मदत देण्याचे आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले.

कळंबोली नवीमुंबई येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देऊन जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. शासन आपल्या पाठीशी असल्याचे रुग्णांना सांगितले. जखमींवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी उपचाराबाबत अधिक माहिती जाणून घेतली. अतीदक्षता विभागात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांना अधिक उपचारासाठी अन्य रुग्णालयात स्थलांतरीत करावे लागल्यास तसे करावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
खाजगी बस आणि ट्रॅक्टर यांच्या मध्ये झालेल्या अपघातात ४६ जखमी आहेत. त्यापैकी ७वारकरी गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
मुख्यमंत्र्यांनी झालेल्या अपघाताची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

Previous articleविधानपरिषद निवडणुकीतील महायुतीच्या महाविजयाबद्दल पिंपरी-चिंचवड भाजपकडून “आनंदोत्सव”
Next articleइंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यासाठी ‘आयटीच’  या संस्थेला परवानगी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − four =