Home ताज्या बातम्या भावी आमदार मायाताई बारणे चिंचवड विधानसभेच्या कामाला केली सुरुवात तर अजित गव्हाणे...

भावी आमदार मायाताई बारणे चिंचवड विधानसभेच्या कामाला केली सुरुवात तर अजित गव्हाणे भोसरी विधानसभेसाठी इच्छुक

0

चिंचवड, दि.०८जुन २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री,पुणे जिल्हाचे पालकमंञी ना.श्री.अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार शासन आपल्या दारी हा उपक्रम चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) व पिंपरी चिंचवड अप्पर तहसिल कार्यालय व पुणे, मुळशी तहसिल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजक मायाताई संतोष बारणे माजी नगरसेविका पिंपरी चिंचवड तसेच संतोष भाऊ वारणे माजी विरोधी पक्षनेता पिंपरी चिंचवड मनपा यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थिती पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. सदरचा कार्यक्रम दि.१० जून, १४ जून, १८ जून,१९ जून, २४ जून २०२४ दरम्यान चिंचवड विधानसभेतील विविध भागात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे, महिला अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका मा.नगरसेविका माया बारणे, कार्याध्यक्ष तथा मा.नगरसेवक राहुल भोसले, शाम लांडे, मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक कैलास बारणे, महारष्ट्र प्रदेश ओबीसी निरीक्षक ॲड.सचिन औटे, ओबीसी शहराध्यक्ष विजय लोखंडे व दीपक साकोरे उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मायाताई संतोष बारणे हे चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक असून त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे तसेच भोसरी विधानसभेसाठी स्वतः शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे इच्छुक असून निवडणूक लढण्याचा त्यांनी जाहीर केलं मात्र अजितदादा पवार व तसेच पक्षश्रेष्ठी ज्याला उमेदवारी देतील त्याचं काम असेही अजित गव्हाणे व माया बारणे यांनी सांगितले
संपूर्ण कार्यक्रमाचे पत्रिका खाली पहा

Previous articleमहापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयनिहाय रात्रपाळीत आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात
Next articleक्षेञिय अधिकार्‍याच्या अर्शिवादाने ब प्रभागातील अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामात वाढ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

8 + 10 =