आता तरी रुग्णालय होणार का? आयुक्त साहेब आता तरी लक्ष देणार का?
रावेत,दि.२२ मे २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका हद्दीतील मोकळ्या भुखंडांचा मुद्दा पुण्यातील कार्यक्रमात उपस्थित करुन मोकळ्या जागा विकण्याचा सपाटा सत्ताधाऱ्यांनी लावल्याचा आरोप केला होता. त्यावर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोघम बोलण्यापेक्षा पुरावे देण्याचे आव्हान ठाकरे यांना दिले होते. याच मुद्यावर मनसेचे पिंपरी चिंचवड शहर संघटक विनोद भंडारी यांनी किवळे रावेत येथील आरक्षित भुखंडाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. गुप्ता यांच्या भुखंडावर रुग्णालय उभारण्याची मागणीही केली होती.याबाबत भंडारी यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह,मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते.
निवेदनात भंडारी यांनी म्हटले, की किवळे, रावेत, मामुर्डी भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता या भागात अनेक ठिकाणी मोठमोठ्या इमारती उभ्या राहत असल्याने या भागातील लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. याभागात राहणारे अनेक नागरिक मध्यमवर्गीय असून, त्यांच्यासाठी या भागात सुसज्ज असे रुग्णालय तातडीने उभे करण्याची गरज आहे. या भागात रुग्णालय नसल्याने अनेक रुग्णांना उपचार घेण्यासाठी पिंपरी येथील वायसीएम अथवा पुणे येथील ससून रुग्णालयात जावे लागते.त्यामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांना वेळीच आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी किवळे मुकाई चौक येथे तातडीने रुग्णालय उभारावे. या निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही पाठवण्यात आल्या होत्या.मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांची सभा देखील त्याच आरक्षित भुखंडावर झाली होती,त्यावेळेस मुख्यमंञी एकनाथ शिंदे ना भंडारी यांनी निवेदन दिले.आणि सर्वाचे लक्ष गुप्ता यांच्या जागेवर वेधले,व अनधिकृ शेड कंटेनर व फुटपाथवर कारवाई करण्याकडे पालिकेचे लक्ष वेधले,पालिकेने देखील कारवाई साठी पुढे सरसावले माञ लोकसभेच्या निवडणुका लागल्याने कारवाई लांबली,व निवडणुका होताच २२ मे २०२४ रोजी ब प्रभाग पि.चि.मनपा च्या वतीने कारवाई करण्यात आली माञ ती कारवाई परिपुर्ण न करता मोघम व गुप्ताला सपोर्टर करण्यात आल्याने अनेक व्यापारी नाराज झाले आहेत.गुप्ता यांच्यावर कारवाई न करता गुप्ता यांनी पुढचे वस्तु मागे घेतल्या याचा अर्थ अनधिकृत चे ते अधिकृत झाले असेच सर्व प्रभागात सर्वांना सहकार्य करावे,पालिका प्रशासन कोणाच्या दबावा खाली आहे.
कारवाई नावाला करुन कोणाच्या डोळ्यात धुळ फेक करता,दम असेल तर आरक्षित भुखंड ताब्यात घ्या,आणि रुग्णालय उभारा अशी मागनी मनसेचे विनोद भंडारी यांनी केली आहे.सदर पालिका प्रशासनाला कधी जाग येणार,स्थानिक नगरसेवक,भावी नगरसेवकांनी देखील स्वार्थाचे राजकारण सोडुन जनतेच्या हिताचे राजकारण करावे आणि हे रुग्णालय उभारण्या साठी हा लढा यशस्वि करावा,यात सर्व जनतेच हित आहे.शो बाजी स्टंटबाजी करु नये.कारवाई पाहुन अनेक चर्चाना उधाण आले असुन वादाची ठिणगीमुळे तर कारवाई झाली असल्याचे पोकळ वार्ता देखील पसरु लागल्या आहेत,त्यामुळे मुकाई चौकातील वातावरण देखील बिघडु लागले आहे.दादागिरी दमबाजी,भांडणे चौकात नविन नाही माञ सर्वच पथारी व्यापारी भयभित झाले आहेत.
नुसतीच कारवाई नको तर आरक्षण भूखंड ताब्यात घ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जागा मालकाला त्याचा मोबदला द्यावा व त्या ठिकाणी भव्य स्वरूपात रुग्णालय उभारावे व त्या रुग्णालयास हृदयसम्राट सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मनसे प्रमुख हिंदू जननायक राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते त्या रुग्णालयाचे उद्घाटन करून लोकार्पण करावे हीच मागणी सुरुवातीपासून आहे आणि शेवटी ही राहील.-विनोद भंडारी-(संघटक-मनसे पिंपरी चिंचवड शहर)