Home ताज्या बातम्या देहुरोड,विकासनगर किवळे भागात श्रीरंग बारणेंचा प्रचार न करण्याचा रिपाईचा ठराव

देहुरोड,विकासनगर किवळे भागात श्रीरंग बारणेंचा प्रचार न करण्याचा रिपाईचा ठराव

0

देहुरोड,दि.०५ मे २०२४ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे ची डोकेदुखी वाढणार
आज दिनांक 5 मे 2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट देहूरोड शहर च्या वतीने तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे अध्यक्ष देहुरोड शहराध्यक्ष अरविंद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.यावेळी
इंद्रपाल सिंग ऋतू ( पश्चिम महाराष्ट्र सदस्य ), बाबू दूध घागरे ( पुणे जिल्हा उपाध्यक्ष ),उत्तम अल्कोंडे ( पुणे जिल्हा सदस्य ), दिलीप कडलक ( मावळ लोकसभा कार्याध्यक्ष ),सुनील गायकवाड ( मावळ तालुका कार्याध्यक्ष), व देहूरोड शहरातील सर्व कार्यकर्ते आजी-माजी पदाधिकारी सर्व उपस्थित होते.आजच्या मिटींगचे जे ठराव मित्र पक्षांबरोबर मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा प्रचार करत असताना रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याकारणाने प्रचार करत असताना रिपब्लिकन पक्षाचे झेंडे मपलर टोपी वापरण्यास मनाई केली. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज झाल्याकारणाने देहुरोड शहरातील व विकासनगर किवळे प्रभाग क्रंमाक १६ मधील रिपब्लिकन पक्षाचा एकही कार्यकर्ता व पदाधिकारी महायुतीचा प्रचार करणार नाही असे ठरावात एकमताने ठराव मांडण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी याची अंमलबजावणी करणे असा मिटींग मध्ये ठराव एकमताने मंजुर करण्यात आला.
त्या मुळे महायुतीचे शिवसेना(शिंदे गट) चे अधिकृत उमेदवार अप्पा बारणे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Previous articleमावळ लोकसभेत नक्की चालय काय? दोघांच्या प्रचाराची ताकत सारखी….कोणाच पारड जड..?
Next articleबारणे यांच्या हॅटट्रिकसाठी लिंगायत समाज मेळाव्यात निर्धार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 − 4 =