Home ताज्या बातम्या साईकाॅलनीमध्ये बेकायदेशीर वृक्षतोड,पालिका प्रशासनाच्या कारवाई कडे सर्वांचे लक्ष

साईकाॅलनीमध्ये बेकायदेशीर वृक्षतोड,पालिका प्रशासनाच्या कारवाई कडे सर्वांचे लक्ष

0

किवळे,दि.०३ मार्च २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- एकीकडे सरकार झाडे लावा झाडे जगवा चा नारा देत आहे. तर दुसरीकडे रेड झोन मध्ये विकास नगर किवळे भागात साई कॉलनीमध्ये बेकायदेशीर वृक्षतोड होत आहे. जागा मालकाचे जागा सहित फुटपाथ वरील प्रशासनाने लावलेल देखील झाडांची कत्तल केली गेली आहे. सदर साई कॉलनी या ठिकाणी अनेक नेते पुढाऱ्यांच्या बेकायदेशीर बांधकाम देखील चालू असल्याचे साई कॉलनीतील परिसरात वावडे उठत आहे.यातील तथ्य पिंपरी चिंचवड महानगरपालिका तपासून पाहणार का? यावर क्षेत्रीय अधिकारी यांच्या आशीर्वादाने हा सर्व उपक्रम चालू आहे का? असा प्रश्न जणू संपूर्ण विकास नगर किवळे भागात उठला आहे. त्यामुळे पि.चि.मनपा पालिका आयुक्त शेखर सिंह हे या प्रकरणात लक्ष घालून साई कॉलनी कडे लक्ष देतील का? असा प्रश्न जनतेतून निर्माण होत आहे.
सदर जागा मालक अज्ञात व्यक्ती असून त्या विरोधात पालिका प्रशासन कठोर कारवाई करेल का? असा मोठा प्रश्न विकास नगर किवळे संपूर्ण परिसरात पसरला आहे.रेडझोन बाधित भाग असल्याने त्या ठिकाणी असा प्रकार घडत आहे.सदर ठिकाणी झालेल्या झाडांची कत्तल करणार्‍या मालकावर व कत्तल करणार्‍या ठेकेदारावर कारवाई होणार का ? अशी मोठी चर्चा संपुर्ण परिसरात पसरली आहे.

Previous articleबिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे
Next articleदेहुरोड- पूर्व वैमनस्यातून 24 वर्षीय युवकाचा निर्घुण खून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 + 10 =