किवळे,दि.१३ मार्च २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- चिंचवड विधानसभा मधील किवळे गाव या ठिकाणी बाहेरील गावातील SRA प्रोजेक्ट मधील नागरिक स्थलांतरित करून किवळे या ठिकाणी त्यांना घरे (कच्चे) न देणे.वाकड काळा खड़क येथील झोपडपट्टी भागातील अंदाजे ४०० ते ५०० घरे ही किवळे मुकाई चौक येथील व्हिजन ऐरिस्टो सोसायटी समोरील बाजूस या कुटुंबाना राहण्यासाठी जागा बिल्डर उपलब्ध करून देत असून तरी या ठिकाणी सर्व सोसायटी बहुल भाग असून अनेक मोठ मोठ्या सोसायटी आहेत तरी सात ते आठ हजार नागरिक या ठिकाणी राहतात तरी सदरील सोसायटी मधील नागरिकांची मागणी आहे की ज्या ठिकाणी SRA प्रोजेक्ट करणार आहे त्या ठिकाणी त्याच गावात या लोकांना राहण्याची सोय करावी तरी हे सर्व लोक व सोसायटी मध्ये राहणारे नागरिक यांच्या मध्ये खूप फरक दिसून आलेला आहे तरी हे सर्व नागरिक या ठिकाणी राहण्यास आले तर यात कित्येक गुन्हेगार असून अनेक गुन्हे या ठिकाणी घड़तील त्याच प्रमाणे पाण्याची सोय आरोग्याची सोय असे अनेक अडचणी निर्माण होतील याची दाट शक्यता असून तरी आपण या SRA प्रोजेक्ट मधील नागरिकांना किवळे मुकाई चौक परिसरात राहण्याची परवानगी देऊ नये अशी पत्राद्वारे विनंती युवासेनेचे मावळ लोकसभा प्रमुख राजेंद्र तरस यांनी केली आहे.थेट उपमुख्यमंञ्याकडेच तक्रार केल्याने शहरात SRA वाकड काळाखडक प्रकल्प चर्चेत आला आहे.त्याच आजी माजी भावी ना हि करमेना म्हणुन मनपा अतिरिक्त आयुक्त ते शहरअभियांना देखील पञ पाठपुरावा चालु केला आहे.राजेंद्र तरस यांचे प्रभागात सुक्ष्म लक्ष असल्याचे यावरुन दिसुन आल्याने नागरिकांनी राजेंद्र तरस यांचे कौतुक केले आहे.राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष व ईतर भागीदार यांचा ही याच ठिकाणी बाजूला ७०० फ्लॅट सदनिका चा म्हाडा चा प्रकल्प असून यात एका विशिष्ट पक्षाच्या माजी नगरसेवक डोळे झाक करताना दिसत असून यामुळे सोसायटी धारकांची फसवणूक होत आहे,अशी चर्चा देखील नागरिकांन मध्ये पसरली आहे.