चिंचवड,दि.१८ नोव्हेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- सद्या च्या चिंचवड विधानसाठी उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांना पुरोगामी विचाराच्या लोकांनि पाठिंबा दिला खरं पण त्या संघटनेच्या माध्यमातून पडणाऱ्या मतदानाला महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी मित्रपक्ष व इतर संघटनांचे मतदान झाले असे म्हणणार का किंवा निवडणूक झाल्यानंतर ह्या पुरोगामी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नेते पाठिंबा मिळवताना जो आदर सन्मान देत होते तो आदर सन्मान शेवटपर्यंत ठेवतील का ? असा सवाल मतदारांना पडला असेल.
ज्या पुरोगामी विचाराच्या संघटना आहे. ज्या शिव फुले,शाहु,आंबेडकर चळवळीचे काम करतात अशा संघटनांना राहुल कलाटे यांची प्रचार यंत्रणा शेवटपर्यंत सन्मानाची वागणूक देऊ शकेल का? पुरोगामी विचारांचे हिंदुत्व आणि दुसरे हिंदुत्व या लढाईमध्ये राहुल कलाटे कोणते हिंदुत्व स्वीकारतील महाविकास आघाडीने राष्ट्रवादीला जागा सोडली त्यामुळे राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही तर खेचुन आणली. मात्र अनेक गोष्टीची खळबळ आणि पक्षांतर्गत अनेक लोकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाले आहे.याचा फायदा भाऊसाहेब भोईर अपक्ष उमेदवार दिग्गज मानले जाणारे भाऊसाहेब भोईर यांना होईल. खांद्याला खांदा लावून काम करताना जे चेहरे कलाटे सोबत पोटनिवडणुकीत होते ते काही चेहरे दिसत नाहीत, कुठेतरी मनामध्ये आमदारकीचे उमेदवारी न भेटल्याचे मनात खदखद आहे. त्यामुळे राहुल कलाटे यांचा विजय पाहिजे तसा अवघड आहे,मात्र मिळालाच तर निसटता विजय मिळेल. कारण राहुल कलाटे यांच्यासमोर भाऊसाहेब भोईर यांचे मोठे आव्हान आहे. राहुल कलाटे आणि भाऊसाहेब भोईर यांच्यामधील अंतर कमी असल्याने दोघांना मानणारा जनाधार हा जवळ जवळचा आहे.त्यामुळे पिंपळे सौदागर,वाकड,काळेवाडी, थेरगाव,राहटणी,चिंचवड,मोरया गोसावी वाल्हेकरवाडी हा परिसर वगळता राहुल कलाटे यांना मानणारा वर्ग कमी आहे.तर पक्षाचे मतदान होईल.त्यामुळे पराभवाकडे न वळता विजयाकडे कलाटे वाटचाल करतील अशी माफक अपेक्षा मतदारांन मध्ये आहे.माञ महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांचा वाढता पाठींबा आणि दिग्गज एकञ नेते मोरेश्वर भोंडवे,नाना काटे, शत्रुघन काटे,प्रशांत शितोळे, चंद्रकांत नखाते हे एकञ आल्याने चिंचवड विधानसभा शंकर जगताप जिंकतील अशी चर्चा विधानसभेत जोर धरु लागली आहे.त्यामुळे पुन्हा जगताप पॅर्टन चालला असेच म्हणावे लागेल