Home ताज्या बातम्या भीमा कोरेगाव दंगलीचे मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांचे शिष्य...

भीमा कोरेगाव दंगलीचे मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांचे शिष्य आमदार महेश लांडगे यांना पुन्हा निवडून देणार का?

0

भोसरी,दि.१७ नोव्हेंबर २०२४ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- भीमा कोरेगाव दंगल घडवणारे मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांचे शिष्य आमदार महेश लांडगे ना जनता निवडून देणार का? भीमा कोरेगाव दंगलीचे कनेक्शन भोसरी विधानसभेत तर नाही ना? अशा अनेक शंका पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. किती जरी आगपाकड करून दहशत निर्माण करून मतदारांना भर सभेत दम दाटी करून निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, तरी यंदाच्या निवडणुकीत तो सफल होणार नाही असे चित्र भोसरी विधानसभेत निर्माण झाले आहे. कारण भीमा कोरेगावची दंगल हे आंबेडकरी समाज व शिव, फुले, शाहू, आंबेडकर,साठे या विचार धारेला मानणारे तसेच पुरोगामी विचार धारेला मानणारे चळवळीतील कोणताही घटक विसरलेला नाही. अशा दोघल्या हिंदुत्ववाद्याला मतदान करणार नाही, जनता सुज्ञ आहे.भारतीय संविधानानुसार सर्वांना हक्क आणि अधिकार आहेत. मात्र कोणत्याही एका गोष्टीवर आढळून राहणे किंवा अवलंबून राहणे यामुळे स्वतःलाच पराभवाला सामोरे जावे लागेल याचे भान भोसरीच्या विद्यमान आमदारांना नाही.

भोसरी मधील धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे का? कारण भारत हा धर्मनिरपेक्ष आहे शालेय जीवनापासून भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत हे शिकवले जाते. मात्र भोसरीतील विद्यमान आमदार महेश लांडगे यांना त्याचा विसर पडला असावा म्हणून हिंदुत्ववादी आमदार म्हणून ते प्रचार करीत आहेत. मात्र त्यांचे हिंदुत्व हे दोगले पणाचे असल्याचे जाणवते, मतांची गोळा बेरीज करण्यासाठी हिंदुत्ववादी आमदार हे धोरण वापरणे थोडे चुकीचे म्हणावे लागेल. मात्र भोसरी विधानसभेचे मतदार हे त्यांना दुजोरा देणार की साथ देणार हे आता मतदारच ठरवतील. पण भोसरी विधानसभेत राहणाऱ्या हिंदू -मुस्लिम,शीख, ईसाई,बौद्ध, ख्रिश्चन १८ पगड जाती बारा बलुतेदार हे एकत्रित नांदत आहेत. मग असा कोणता आघात झाला किंवा असे काय घडले,भारतीय संविधानानुसार भारतीय निवडणूक आयोग मार्फत भोसरी विधानसभेत संपूर्ण भोसरी विधानसभेचे नेतृत्व करणारे प्रतिनिधी विद्यमान आमदार यांना भीमा कोरेगावच्या दंगलीचे मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांचे धारकरी हिंदुत्व पुढे करावे लागले.विरोधी उमेदवार अजित गव्हाणे यांचा वाढता पाठिंबा पचनी पडेना म्हणून फक्त हिंदुत्ववादी आमदार पाहिजे म्हणणे हे निवडणूक आयोगाच्या नियमाच्या कितपत योग्य आहे. उद्या जर दंगल घडली तर याला जबाबदार इथले निवडणूक अधिकारी राहतील. इथल्या निवडणूक अधिकारी दंगल किंवा जातीवाद घडण्याची वाट पाहतात का! प्रक्षोभनीय भाषण करून आमदार महेश लांडगे काय साध्य करू पाहतात. इथली जनता सुज्ञ आहे, इथला मतदार राजा सुज्ञ आहे.

भीमा कोरेगाव दंगलीचे मुख्य आरोपी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांचा उदो उदो करणाऱ्या महेश लांडगे यांना मतदान करणार नाहीत. हे जनतेने निवडणूक पूर्व इंद्रायणी धडीत संभाजी भिडेंना महेश लांडगेनी आणले तेव्हाच ठरवले होते. मात्र निवडणुकीची वाट ते पाहत होते महेश लांडगे यांनी मिलिंद एकबोटे यांना सभेमध्ये बोलवले व त्यांची निवडणुकीत सभा घेतली तिथूनच आणखी जनाधार त्यांचा कमी होऊ लागला.संभाजी भिडेंचा धारकरी असल्याचा पुरावा देखील त्यांनी त्यांच्या भर सभेतील भाषणात दिला मी वारकरी आहे तसं धारकरी पण आहे.२० तारखेनंतर महेश लांडगे काय आहे ते पाहायला मिळेल असंच काहीतरी ते बोलल्याचे आढळते. मग निवडणूक आयोग अजून गप्प का भर सभेत मतदार राजाला धमकी देणे दडपशाही करणे हे आता चालणार नाही हा लोकशाहीचा उत्सव आहे. लोकशाहीच्या उत्सवात मतदान करण्यासाठी मतदार राजा हा घरातून बाहेर पडला पाहिजे यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र अशा धमक्याने आणि घाबरवल्याने मतदार राजा ह्या भीतीपोटी घरातून बाहेर मतदानाला येणारच नाही याची जाणीव निवडणूक आयोगाला नसावी त्यामुळे इथल्या निवडणूक अधिकारी गप्प आहेत. आता अशी दमदाटी चालणार नाही मतदार राजा भीमा कोरेगाव दंगल घडवणाऱ्या मुख्य आरोपी संभाजी भिडे यांच्या शिष्याला निवडून देणार नाही भोसरी विधानसभेतील जनता ही नवा चेहरा आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा चेहरा मागत आहे आणि तो अजित गव्हाणे यांच्या रूपाने भोसरीकरांना दिसत आहे त्यामुळे अजित गव्हाणे यांचा जनाधार हा वाढत आहे त्याचा पाठिंबा देखील वाढत आहे त्या त्यामुळे विद्यमान आमदार व त्यांच्या समर्थकांमध्ये पोटसुळु उठला आहे.कोणत्या क्षणाला कोणता निर्णय घेतील काय करतील याचे भान देखील त्यांना राहिले नाही. हा लोकशाहीचा उत्सव आहे लोकशाही मार्गाने चालला पाहिजे याकडे त्यांचे मात्र दुर्लक्ष आहे.त्यांच्या भीतीमुळे जरी मतदार बोलत नसले तरी मात्र मतदानातून विरोध आणि निषेध करतील त्यामुळे भोसरी विधानसभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे भोसरीतील आमदार महेश लांडगे यांनी दहा वर्षे कामे केली आहेत तर त्यांना त्यांच्या विकास कामाच्या जोरावर मतदान मागण्या ऐवजी ते असे का करत आहेत असे का बोलत आहेत याकडे सर्वांचे लक्ष आहे त्यामुळे भोसरीत बदल घडणार हे चित्र मात्र आता दिसू लागले आहे.
…लवकरच भाग-२ प्रसिद्ध होईल…..

Previous article‘बाबासाहेबांचे संविधान कोणी बदलू शकत नाही; कोणाला बदलू देणार नाही’ – नितीन गडकरी
Next articleपराभव समोर दिसू लागल्याने भाजप उमेदवाराकडून पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 − seven =