चिंचवड, दि. १४ नोव्हेंबर २०२४ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- चिंचवड विधानसभेत पुन्हा कमळ फुलणारची चर्चा; कपाटाचा जोर मात्र कायम तर तुतारीचा प्रचारात फक्त कार्यकर्त्याची धामधुम भाजपा च्या शंकर जगताप यांचे चिन्ह कमळ असुन प्रचारात आघाडीवर तर अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांचे चिन्ह कपाट तर राहुल कलाटे यांचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असून अजुन प्रचाराची जमावजमव मध्ये व्यस्त, तर महाविकास अघाडीचे तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह असणारे राहुल कलाटे हे प्रचारात भेटीगाटी मध्ये व्यस्त माञ कर्यकर्ते वगळता नागरीकांनमध्ये अजुन तुतारी वाजवणारा माणूस ची चर्चा नाही, त्यामुळे मतदारांन मध्येही संभ्रम अजुन दिसुन येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांची भावनेची लाट अजून कायम असल्याची चर्चा नागरीकांनमध्ये अद्याप तरी आहे. कपाटाचा चा प्रचारात जोर कायम आहे. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तिकीट राहुल कलाटे यांनी त्यांची राजकीय शैली वापरून मिळवले माञ नागरिकांन पर्यंत राहुल कलाटे अजुन पोहचले नाहीत.
मतदारांना मतदान करण्यासाठी व त्यांचे मन वळवण्यात कोण यशस्वी ठरणार ह्या कडे सर्वाचे लक्ष लागून आहेत. माञ रिंगणात तिन्ही उमेदवारांची चर्चा जरी असली तरी रिगंणात अजुन १९ उमेदवार आहेत, कोण अचानक पुढे येईल याची खात्री नाही, समाजसेवेचा वसा असणारे सिद्धिकी शेख सिंह चिन्ह घेऊन तर मारुती भापकर पेनाची निप सात किरणासह चिन्ह घेऊन निवडणुक लढवत आहेत. राजकीय चढाओढीत नागरिकांच्या मुळ प्रश्नानवर माञ कोणत्याच उमेदवाराचे लक्ष नाही, राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीचे तिकीट जरी असले तरी नेत्यांचा मनात अजुन संभ्रम आहे. तरी कार्य कर्ते माञ भाऊसाहेब भोईर व शंकर जगताप यांच्या कडे वळतायत या सर्व धामधुममीत शंकर जगताप यांची लोकप्रियता वाढत चालली आहे.त्यामुळे जगताप विरुद्ध भोईर अशी दुरंगी लढत चिंचवड विधानसभेत पाहायला मिळेल.अशी चर्चा संपुर्ण शहरात पसरली आहे.तर या कडे सर्वाचे लक्ष लागलेल आहे.