Home ताज्या बातम्या इंद्रायणीनगर , बालाजीनगरमधून अजित गव्हाणे यांना ‘लीड’ मिळवून देण्याची जबाबदारी आमची !

इंद्रायणीनगर , बालाजीनगरमधून अजित गव्हाणे यांना ‘लीड’ मिळवून देण्याची जबाबदारी आमची !

0

भोसरी ,दि.१४नोव्हेबंर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-इंद्रायणीनगर, बालाजीनगर परिसरातील शांतता आणि सलोखा महत्त्वाचा आहे असे म्हणत परिसरातील ज्येष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेवक गुरुवारी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरते. इंद्रायणीनगर , बालाजीनगरमधून अजित गव्हाणे यांना ‘लीड’ मिळवून देण्याची जबाबदारी आमची असे म्हणत या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारात चांगलीच रंगत आणली. दरम्यान भोसरी येथे बुधवारी झालेल्या शरद पवार यांच्या सभेमुळे वातावरण फिरले असल्याची प्रचिती या प्रचार दौऱ्यातील गर्दीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि 14) प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रचार दौऱ्यात सहभागी झालेल्या माजी नगरसेवक, जेष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. यावेळी   बालाजीनगर, इंद्रायणीनगर मधून अजित गव्हाणे यांना ‘लीड ‘ मिळवून देण्याची जबाबदारी आमची असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
अजित गव्हाणे यांनी गुरुवारी बालाजीनगर येथून प्रचाराला सुरुवात केली. या परिसरातील गणपती मंदिर, दुर्गा माता मंदिर, हनुमान मंदिर, दत्त मंदिर येथे त्यांनी दर्शन घेतले. यावेळी विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित गव्हाणे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यामध्ये समता मंडळ, साम्राज्य प्रतिष्ठान, वीर हनुमान, उत्कृष्ट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गव्हाणे यांचे स्वागत केले. मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांना अजित गव्हाणे यांचा नेहमीच पाठिंबा असतो.त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व त्यांचे कुटुंबीय गव्हाणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पदाधिकाऱ्यांची शक्ती एकवटली 
बालाजीनगर, इंद्रायणीनगर परिसरामध्ये आजी -माजी पदाधिकारी, माजी नगरसेवकांची शक्ती एकवटलेली दिसून आली. गुरुवारी या प्रचार दौऱ्यामध्ये स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे,  माजी नगरसेवक संजय वाबळे, रवी लांडगे, सारिका लांडगे, विक्रांत लांडे, शिवसेना संघटक तुषार सहाने, विजयकुमार पिरंगुटे, माणिकराव जैद, चंद्रकांत नाणेकर, आकाश कंद  सहभागी झाले होते. यांच्या समवेत अनेक आजी-माजी पदाधिकारी देखील उपस्थित होते.
इंद्रायणीनगर, बालाजीनगर परिसरामधील शांतता आणि सलोखा या महत्त्वाचा मुद्द्यावर येथील नागरिक एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. माजी पदाधिकाऱ्यांनी या भागातून परिवर्तन घडवण्याचा निश्चय केला आहे. या भागांमध्ये सुनियोजित व्यवस्थापन, शांतता प्रस्थापित करणे यासाठी प्रयत्न केले जातील.
अजित गव्हाणे
उमेदवार महाविकास आघाडी
भोसरी विधानसभा मतदारसंघ
Previous articleमावळचा विकास जिंकेल की मावळची दडपशाही,बापु भेगडेनां लाॅबींगचा फटका बसणार..?
Next articleअण्णा बनसोडे अत्यंत सक्रिय व काम करणारा कार्यकर्ता,विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा आरपीआयचा निर्धार – रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen − 8 =