Home ताज्या बातम्या निलध्वज माने यांच्या त्या फेसबुक पोस्टची का होतीय चर्चा,कोणाचा घेतलाय समाचार

निलध्वज माने यांच्या त्या फेसबुक पोस्टची का होतीय चर्चा,कोणाचा घेतलाय समाचार

0

पिंपरी,दि.१० नोव्हेबंर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- निलध्वज माने हे मुक्त पत्रकार असून पिंपरी विधानसभेतील मतदार आहेत मात्र त्यांनी अलीकडेच अण्णा बनसोडे यांना फेक नरेटीव साधून आरोप केले जात आहे. त्यातच विरोधी उमेदवारांना जणू एक प्रत्युत्तरच दिले आहे की अशी चर्चा संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात पसरली आहे काय आहे चर्चा? कोणावर केलेत आरोप? वाचा खाली…

आपण
सुलक्षणाताईंचा
#मास्क_पुरवठयाचा
पराक्रम विसरला तर नाही ना….?

पिंपरी मतदार संघातील आमदारकीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत यांनी करोना सारख्या अतिसंवेदनशील परिस्थिती मध्ये आपल्या भावाला व पतिला स्वतःच्या फायदयासाठी दिले होते महापालिकेचे टेंडर…!

कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिकेने शहरातील नागरिकांना मोफत मास्क पुरविण्यासाठी दहा लाख मास्कची खरेदी केली. सुलक्षणा शिलवंत यांनी नगरसेवकपदाचा गैरवापर करून पतीच्या आणि भाऊ संचालक असलेल्या कंपनीच्या नावे महापालिकेला १ लाख मास्क पुरविले. त्यापोटी दहा लाखांची रक्कमही महापालिकेकडून प्राप्त केली. लोकप्रतिनिधी (नगरसेवक) म्हणून कार्यरत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वत:च्या फायद्यासाठी महापालिकेच्या कोणत्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. त्याचे नगरसेवकपद रद्द होते. या कायदेशीर तरतुदीनुसार सुलक्षणा शिलवंत या अपात्र ठरत असल्यामुळे त्यांचे पद रद्द करावे, यासाठी जितेंद्र ननावरे यांनी अ‍ॅड. निरंजन भावके यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

ताईंच्या हाती नगरसेवक पद आले त्यांनी स्वतःच्या कुटूंबाचा फायदा पाहिला आता आमदारकी आल्यावर काय करतील….??
त्यामुळे योग्य विचार करून
आपला आमदार निवडुया आणि,
पिंपरी मतदारसंघाचा विकास घडवुया..!

तुर्तास इतकेचं परत सविस्तर व्यक्त होईलचं.
आपलाच…
#निलध्वज
( मुक्त पत्रकार)

Previous articleअण्णा बनसोडे यांचा प्रवास प्रेरणादायी – अजित पवार
Next articleलाडक्या भावा, तू एकटा नाहीस! तालुक्यातील सगळ्या माता-भगिनी तुमच्या पाठीशी,विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − three =