पिंपरी,दि.१० नोव्हेंबर २०२४ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांची काराकीर्द सतत चर्चेत राहिली आहे. अण्णा बनसोडे यांच्यावर अनेकांनी वेगवेगळे आरोप केले मात्र तेच अण्णा बनसोडे यांच्या सोबत खंबीरपणे त्यांना निवडून देण्यासाठी आज सोबत आहेत. व त्यांना ताकद देत आहे. त्यामुळे अण्णा बनसोडे यांचे पारडे पुन्हा एकदा जड झाले आहे. अण्णा बनसोडे यांनी पुन्हा एकदा राजकीय करिष्मा दाखवला आहे. त्यामुळे अण्णा बनसोडे पुन्हा आमदार होतील यावर नागरिकांमध्ये मोठी चर्चा आहे.त्यातच प्रभाग क्रमांक १६ किवळे रावेत विकास नगरचे माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी पिंपरी विधानसभेत शाहू महाराजांच्या महाराष्ट्र स्वराज पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. शाहू महाराजांनी आरक्षणासाठी लढत दिली असून मराठा आरक्षण साठी सतत पुढाकार घेऊन पुढे असतात.त्यामुळे पिंपरी विधानसभेतील राखीव मतदार संघात ओव्हाळ यांना कितपत फायदा होईल, हे सध्या तरी सांगता येणार नाही. मात्र वेगवेगळ्या मुद्द्यावर बाळासाहेब यांनी पिंपरी विधानसभेत दंड थोपटले असून निवडणूक जिंकण्यासाठी आमदार होण्यासाठी प्रचारात आघाडी घेत आहे. माध्यम प्रतिनिधींनी बाळासाहेब ओव्हाळ यांच्याशी संपर्क साधला असता पिंपरी विधानसभेत कोणतीही तिरंगी लढत होणार नसून फक्त बनसोडे आणि ओव्हाळ अशी लढत पाहायला मिळेल असे स्पष्ट मत व्यक्त केले.