Home ताज्या बातम्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजला, २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेबंर ला...

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजला, २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेबंर ला निकाल

0

पिंपरी,दि.१५ ऑक्टोबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं, केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर कार्यक्रम आज (दि.15) जाहीर केला आहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर २०२४ ला निवडणुका पार पडणार आहेत. तर, मतमोजणी होऊन निकाल २३ नोव्हेंबरला घोषित केले जाणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर ही पहिली विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्याने आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

२८८ विधान सभा तसेच नांदेड लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुक जाहिर झाली आहे.कोण मारणार बाजी महायुती की महाविकास आघाडी का तिसरी आघाडी तर अपक्ष कुणाचा खेळ चालणार कुणाचा आवाज घुमणार पहा प्रजेचा विकास ऑनलाइन न्यूज चॅनलवर www.prajechavikas.com

Previous articleभाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आयोजित रावण दहन कार्यक्रमाला लाखांहून अधिक नागरिकांची गर्दी,”शक्तीप्रदर्शन”
Next articleभोसरीकरांचा तुम्ही अपमान केला; आमचा स्वाभिमान दुखावला!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve + 7 =