Home ताज्या बातम्या खरी मैत्री कोणती ? खरा मित्र कोण ?-डॉ. शीतल म. रणधीर

खरी मैत्री कोणती ? खरा मित्र कोण ?-डॉ. शीतल म. रणधीर

0

पुणे,दि.०५ ऑगस्ट २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- आपल्या अनुपस्थित आपल्या बहिण भावांचा मोठा भाऊ असतो. आपल्या आईचा मुलगा असतो. आपल्या बापाचा भक्कम आधार असतो आणि आपले ध्येय आपल्या मागे पूर्ण करणारा किमयागार असतो

मित्र हो तो कर्ण सा

जो कष्ट सारे काट दे !

ईश्वर भी दे चेतावणी

वो तब भी मेरा साथ दे !

माझ्या मुलांनो कदाचित शिक्षक आणि पालक म्हणून माझा सल्ला जरासा जड वाटेल. पण तो देण योग्य आहे. खरा मित्र कोण ? तर याचे उत्तर आहे ती व्यक्ती जी तुम्हाला कायम तुमचे ध्येय आठवण करून देतो .

खरा मित्र हा तुम्हाला तुमचे आयुष्य त्या समोर एक झाड आणि त्या झाडावर एक पक्षी आणि त्या पक्षाचा फक्त डोळा कसा भेदायचा हे शिकवतो .

· जो तुम्हाला तुमच्या चुका दाखवतो आणि आयुष्याच्या रंगमंचावर तुम्हाला परफेक्ट बनवतो .

· जो तुमच्या परफेक्ट होण्याचा प्रत्येक क्षण तुमच्याबरोबर सेलिब्रेट करेल.

· वेळप्रसंगी जो तुमची भाकरी आणि नोकरी होतो, तुमच्या गरजेच्या वस्तूंचा तो मॉल असतो.

· ज्याच्या समोर तुम्ही क्रिस्टल क्लियर असता.

· तो एक संमिश्र रसायन असते . अनेक व्यक्तिमत्त्वाचे तो मिश्रण असतो, कधी तुमचा मोठा भाऊ असतो कधी तुमची लहान बहिण बनतो, कधी कठोर शिक्षक कधी प्रियकर. भगवंताने या नात्याला मिश्रण मध्ये बनवले.

· तुमच्या सर्व लकबी, चुका त्याला माहित असतात तो देव माणूस म्हणजे तुमचा मित्र.

· तुम्हाला जेव्हा काही गोष्टी दुखावतात तेव्हा तो तुम्हाला समजून सांगतो :-

*आग लगे बस्ती मे, हम हमारी मस्तीमे* ! मित्रा त्या पक्षाचा डोळा फक्त बघ” हे सांगतो.

· ज्याच्याकडे आपण मोकळे पानाणे रडू शकतो, वेड्या सारखे हसू शकतो . जो आपला मित्र खास असतो आणि शत्रू सुद्धा ग्रेट असतो.

· ज्याला आपल्याला आपल्या चुकीबद्दल कानाखाली मारण्याचा अधिकार असतो आणि मारून झाल्यावर ज्याच्या हृदयाला आपल्या पेक्षा जास्त वेदना होतात तो खरा मित्र असतो.

· जो तुम्हाला नाती जपायला शिकवतो तो खरा मित्र

आपले ध्येय, त्या झाडाला किती पाने आहे ?. कोण चांगले आहे कोण वाईट आहे याचा संबंध कधीच ठेऊ नये. कारण आयुष्य एकदाच मिळते तिथे रिटेक नाही . आपला संबंध फक्त आपल्या ध्येय पूर्ती पुरता असला पाहिजे हे वारंवार सांगणारा तो *क्रूर व्यक्ती पण प्रिय मित्र* असतो असतो. आपल्या तोंडावरचे दुखं: ज्याच्या समोर अश्रू होऊन वितळते तो करुणेचा सागर आपला खरा मित्र असतो.

आपण एखाद्या वेळी आपले शत्रू विसरू पण तो कधीच विसरत नाही आणि तुम्हाला सतत वाचवतो तो तुमचा खरा मित्र. असा देव माणूस जर तुमच्या आयुष्यात असेल तर तुमची आई म्हणून, तुमची टीचर म्हणून मी तुम्ही माझी मुले आहात याचा अभिमान बाळगते.

पण हेही लक्षात ठेवा जो तुम्हाला नाती जपायला शिकवत नाही

जो तुम्हाला दारू, सिगारेट देतो आणि त्या नंतर बाकीचे रोग लागणारे नाद देतो तो तुमच्या अनेक पिढ्यांचा शत्रू असतो. फुकटचे सल्ले देणारे कुत्रे पाळू नका. कारण असे लोक स्वतः सुखी असल्याचा फक्त खोटा देखावा करत असतात. तुमच्या मागे असे लोक कर्जबाजारी असतात. कारण फुकट सल्ले द्यायला आणि तुमच्या कुटुंबात आग लावायला ज्या लोकांना वेळ असतो ते रिकामटेकडे काम करत नसतात. आणि म्हणून सल्ले देण्यात वेळ घालवतात… अश्या लोकांना टग्यांना मी खूप ज्ञान पाजळताना बघितले. कुठलीही डिग्री नसताना असे लोक खूप ठोकून क्लेम करतात. तेव्हा अशा लोकांपासुन आपल्याला आपल्या कुटुंबाला लांब राहता आले पाहिजे..

तुम्ही चांगल्या लोकांमध्ये राहिलात कि तुमचे अपोआप चांगले होते या मागे मानसशास्त्र आहे. तुमचा मित्र जर क्लास वन ऑफिसर झाला की तुम्ही अपोआप होताच. तेवढी उंचीची स्वप्न्त पाहता. ती पाहणे महत्वाची आहेच.

माझ्या विद्यार्थ्यानो कदाचित मी सांगितलेल्या गोष्टी आज जड जातील उद्या माझ्या वयाचे जेव्हा व्हाल तेव्हा हळू हळू पटेल.

शेवटचा एक सल्ला तुमचा मित्र आणि तुमचा शत्रू हा तुमच्या पेक्षा brilliant हवा. कारण अशा माणसांच्या सहवासात त्यांनी केलेला अपमान सुद्धा तुम्हाला घडवतो. तेव्हा अशा विजनरी शत्रूचा कायम आदर करायला विसरू नका.

फडतूस लोकांशी शत्रुता सुद्धा करू नका…फडतूस लोकांकडे भरपूर वेळ असतो . त्यांना करीयर आपली मुले आपले कुटुंब यांच्या पेक्षा श्रेष्ठ शत्रू वाटतो आणि ते आयुष्य, आपले श्वास मागे शेण खाण्यात वाया घालवतात. हे अनमोल आयुष्य वाया घालउ नका. आयुष्य खूप छोटे आहे तेव्हा ते अप्रतिम जगूया …

Previous articleमुकाई चौक-२३ पिडित कुटुंबाचा रस्त्याचा प्रश्न अजुनही प्रलंबित प्रशासनाकडुन उदासिनता अंदोलन चिघळण्याची शक्यता??
Next articleजयंत पाटील साहेब पिंपरी विधानसभेसाठी देवेंद्र तायडेच हवेत! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात मागणीचा वाढतोय जोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × two =