पुणे,०१ जुलै २०२४ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त गोरख भिकुले, प्रमोद बेंगरुट आदी उपस्थित होते.