पुणे,दि.२८ जुन २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- म्युझिकल ग्रुप व दीप ज्योती बहुउद्देशीय महिला विकास संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने रिमझिम के गीत सावन गाये हा हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम पुणे येथील पत्रकार भवन मध्ये पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात बहरदार गाण्यांनी झाली. ऐरणीच्या देवा तुला या गाण्याने नेहा दंडवते यांनी सादर केले. नंतर हसता हुआ नूरानी चेहरा मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी मनाच्या धुंदीत लहरीत ते आखो से तूने ये क्या कह दिया लेकर हम दिवाना दिल व रिमझिम के गीत सावन गाये ते ये दोस्ती हम नही तोडेंगे अशा प्रकारे विविध गाण्यांची रंगत वाढवत रसिक प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून कधी ठेका धरत आनंद लुटला तीन तास कधी झाले तरी रसिक माञ गाण्याचा आस्वाद घेत होते.आदर्श माता पुरस्कार श्रीमती शकुंतला चंद्रकांत घाडगे यांना श्री राजाभाऊ तिखे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कराओके संघटना यांचे हस्ते देण्यात आला.
श्री आनंद गायकवाड व उमा मेनन यांना विशेष कलाकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्री लोखंडे काका, श्री गुजर काका, पूजा जैन,अश्विनी वडके, गीता को सुंदर आदी मान्यवर उपस्थित होते. गाण्याची हिंदी मराठी मैफील कार्यक्रमास विना शुल्क घण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन कलावंतांकडून केले गेल व कार्यक्रमाचे आयोजक श्री अनिल घाडगे व श्री गजानन बुडूकुले व श्रीमती जोशना शेटे अमरावती यांनी केले. गायक कलाकार आनंद गायकवाड,अरुण सरमाने, मल्लिकार्जुन बनसोडे, एस आर लांजेकर, अर्चनकुमार कृष्णमूर्ती, अभिजीत असरौंडकर, अनिल घाडगे जोशना शेटे, नेहा दंडवते, उमा मेनन कांता कांबळे, छाया अय्यर, उमा पाटील, श्रुती चिंतामणी,ज्योती पाटसकर या कलाकारांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे निवेदन अरुण सरमाने व प्रेरणा रासने यांनी उत्तमरीत्या केले.कार्यक्रमाचे ध्वनी संकलन शैलेश घावटे,सौमिल घावटे यांनी व्हिडिओ ग्राफी व नागेश झळकी यांनी फोटोग्राफी असा हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादात पार पडला.