Home ताज्या बातम्या शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून

शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून

0

देहुगाव,दि.२४ जुन २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- विकृत मानसिकतेचा कळस शारीरिक संबंध ठेवू देत नाही म्हणून ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्हातील देहुगाव या ठिकाणी घडली आहे. गाथा मंदिराच्या पाठीमागे आनंद डोह घाट परिसरात २० जून रोजी हि घटना घडली आहे.पोलिसांनी पतीला अटक केली असून न्यायालयात हजर केले, न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रतीक्षा जयदीप यादव (वय-२१) असं खून झालेल्या विवाहितेचे नाव असुन आरोपी पतीचे नाव जयदीप अर्जुन यादव (वय-२९, रा. देहूगाव, मूळ. रा. चिखलगोल, सांगली) असे आहे. पोलीस अंमलदार किरण पाटील यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

कोल्हापुरातील कुरूंदवाड येथील सलून व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा हिचे एम. एस. सी.पर्यंत शिक्षण झाले होते. डिप्लोमा इंजिनियर पर्यंत शिक्षण झालेला जयदीप यादव आणि प्रतीक्षा हे दोन महिन्यापूर्वी विवाहबंधनात अडकले. जयदिप हा खाजगी कंपनीत पुणे येथे नोकरीला आहे. ८ दिवसापूर्वी पत्नी प्रतीक्षाला घेऊन देहूगाव येथे दोघे राहण्यास आले होते.
पत्नी शारीरिक संबंध ठेऊ देत नाही तसेच तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जयदीपला होता. त्यावरून त्याने गुरुवारी रात्री प्रतिक्षाला घेऊन देहूगाव येथील गाथा मंदिरा मागे इंद्रायणी नदीच्या घाटावर फिरायला नेले असता. त्या ठिकाणी ओढणीने प्रतिक्षाचा गळा आवळून त्याने खून केला. संशयित आरोपी म्हणुन आरोपी पती जयदीप यादव ला पोलिसांनी अटक केली असता,पोलिसी खाक्या दाखवताच चौकशी दरम्यान गुन्हाची कबुली दिली व, गुन्हा लपविण्यासाठी तिचा व स्वतःचा मोबाइल इंद्रायणी नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपीने सांगितले.

याप्रकरणी आरोपी जयदीप यादवच्या विरोधात देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर. शुक्रवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करून आई- वडिलांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला.या प्रकरणी पुढील तपास पोलिस देहुरोड पोलिस करीत आहेत.

Previous articleशक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या समाधानानंतरच भूसंपादनाची प्रक्रिया – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे
Next article“PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही?” : हायकोर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × one =