Home गडचिरोली बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे

बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे

0

किवळे,दि.२९ फेब्रुवारी २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी सामाजिक संघटनेने केली आहे. बिरसा मुंडा यांचे १५ नोव्हेंबरला जयंती असते, त्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी. तसेच भारत देशाच्या बाहेर व भारत देशांमध्ये मोठ्या उत्साहान ही जयंती साजरी होत असते. महाराष्ट्र सरकारने व आदिवासी विभागाने शासकीय सुट्टी जाहीर करून व तसेच परिपत्रक काढावे अशी विनंती पत्राद्वारे क्रांतीवीर बिरसा मुंडा आदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. जर सुट्टी जाहीर केली नाही तर जन आंदोलन छेडले जाईल याची शासनाने दखल घ्यावी अशा आशयाचे पत्र नामदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विभागीय आयुक्त पुणे तसेच जिल्हाधिकारी पुणे यांना क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या पत्रावर राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग सदाशिव परचंडराव व ज्ञानोबा प्रभाकर अध्यक्ष पुणे जिल्हा यांच्या सहीने हे पत्र दिले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × five =

error: Content is protected !!
Exit mobile version