Home ताज्या बातम्या १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातना नाट्य कलावंतांसोबत  पारंपरिक लोककलांनी सजली...

१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातना नाट्य कलावंतांसोबत  पारंपरिक लोककलांनी सजली नाट्य दिंडी

111
0

पिंपरी, (दि. ६ जानेवारी २०२3(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- ढोल, ताशा, लेझीम, गुलाबी फेटे, रांगोळ्यांच्या पायघड्या अन् सर्व कलाकारांच्या उपस्थित १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्य दिंडी आज निघाली. नाट्य कलावंतांसोबत पारंपरीक लोककला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोक कलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती. ही नाट्य दिंडी पाहण्यासाठी पिंपरी चिंचवड करांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. यावेळी नागरिकांना कलाकारांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. तसेच अनेकांनी हे सर्वक्षण आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.

श्री मोरया गोसावी मंदिर पासून या नाट्य दिंडीला सुरूवात झाली. गांधी पेठ, तानाजी नगर मार्गे ही दिंडी श्री मोरया गोसावी क्रिडा संकुलापर्यंत पोहचली.
नाट्य दिंडीचे स्वागत लोकांनी खूप उत्साहात केले. नाट्य दिंडीच्या सुरूवातीला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पिंपरी चिंचवडचे कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल आणि असंख्य नाट्य कलावंत सहभागी झाले होते.
पिंपरी चिंचवडकरांची सकाळ ढोल, ताशा, लेझीम अन् जयघोषाच्या आवाजाने झाली. त्यात सकाळच्या वेळी वासुदेव, पिंगळा, गोंधळी, वाघ्या – मुरळी यांच्या सादरीकरणाने नागरिक भारावून गेले होते. ही दिमाखदार नाट्य दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. ठिकठिकाणी थांबून नागरिकांनी या नाट्य दिंडीचा नयनरम्य सोहळा अनुभवला. नाट्य दिंडी आपल्या दारी असा काहीसा अनुभव यावेळी रसिकांनी अनुभवला.
नाट्यदिंडीमध्ये अभिनेत्री कविता लाड, तेजश्री प्रधान, सुरेखा कुडची, प्रतीक्षा लोणकर, निर्मिती सावंत,अमृता सुभाष, प्रिया बेर्डे, वर्षा उसगावकर, स्पुहा जोशी, कांचन अधिकारी, शुभांगी गोखले, सुकन्या मोने, सविता मालपेकर तसेच अभिनेता सुशांत शेलार, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, चेतन दळवी, संजय मोने, वैभव मांगले, उमेश कामत, संजय खापरे, सुयश टिळक, पुष्कर श्रोत्री, संदीप पाठक यांसह अनेक प्रसिद्ध कलावंत सहभागी झाले होते.

Previous article१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन
Next article‘हरहर महादेव….जय भवानी जय शिवाजी…’ च्या जयघोषाने शंभराव्या नाट्य संमेलनाचा मुख्य सभा मंडप दुमदुमूला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × four =