पिंपरी,दि.२८ डिसेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवडचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी अखेर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला.महाराष्र्टात चालल्या राजकारणांचा आढावा घेत शेवटी स्वता लोकसभा लढवण्याचा निर्धार करत अजितदादा पवार यांच्या गटातुन वेगळ होण्याचा निर्णय घेतला.महायुती मध्ये अजित दादा सामील झाल्याने श्रीरंग बारणेचा ही निभाव लागणार नाही,मागच्या लोकसभेत पार्थ पवारांचा पराभव हा अजित दादा पवार यांच्या जीवारी लागला होता.तेव्हा पासुन अजितदादांनी मावळात पकड बसवली आणि आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातुन मावळ लोकसभा बांधणी पुर्ण करत पार्थ पवार यांना लोकसभेतुन लोकनियुक्त खासदार बनवण्याचे नियोजन केले आहे.त्यामुळे महायुतीत जरी असले तरी राष्र्टवादी तुन पार्थ पवार हे उमेदवार असतील त्यामुळे पुन्हा तिकीट डावले जाणार हे संजोग वाघेरे यांना ठाऊक आहे.त्यामुळे पक्ष बदल करत वाघेरे पाटलांनी आता दंड थोपटले आहे.संजोग वाघेरे आणि पार्थ पवार अशी लढत पाहयला मिळणार असल्याने मावळ लोकसभा मतदार संघात चर्चेला उधान आले आहे.
शनिवारी ३० डिसेंबर ला संजोग वाघेरे शिवबंधन बांधणार आहेत.तशी बॅनर बाजी देखील वाघेरे गटाकडुन केली गेली आहे. ठाकरे गटाकडून वाघेरे यांना मावळमधून उमेदवारी मिळण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट चिञ दिसत आहे माञ अद्याप अजुन घोषणा नाही. वाघेरे यांचा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का मानला जात आहे.
महायुतीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे राहणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे.माञ अजितदादाची मनधरणी करण्यात शिवसेना शिंदे गटाला,व भाजपाला अपयश येणार हे ही माञ तितकेच खरे आहे,त्यामुळे मागील दोन टर्म लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असलेल्या संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटाकडे जाण्याचा म्हत्वपुर्ण निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत मावळमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर ठाकरे यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला होता.
बुधवारी वाघेरे यांना निरोप पाठवला आणि पक्ष प्रवेशासाठी शनिवारी बोलवले आहे. त्यामुळे वाघेरे यांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाने शिक्कामोर्तब केले आहे असे म्हटले जात आहे. वाघेरे यांचे वडील भिकू वाघेरे हे शहराचे महापौर होते. वाघेरे घराणे पवार कुटुंबाशी एकनिष्ठ होते. संजोग वाघेरे यांना महापौर, राष्ट्रवादीचे अध्यक्षपद अजित दादांनी दिले होते. पक्षातील फुटीनंतर ते अजित पवार यांच्या गटात होते. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे संपुर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उठली आहे.पिंपरीत माञ योग्य निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यान मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राष्ट्रवादीतील कोणत्याही नेत्याबाबत नाराजी नाही. उमेदवारीची चर्चा झाली होती. दोन दिवसात कळवितो असे सांगितले होते. शनिवारी प्रवेशासाठी बोलविले आहे. राजकारणात खूप पाठीमागे राहिलो. पुढे जाण्यासाठी निर्णय घेतला. -संजोग वाघेरे, माजी महापौर