Home ताज्या बातम्या सकल मराठा समाजाच्या वतीने पिंपळे गुरव येथे एकदिवसीय उपोषण

सकल मराठा समाजाच्या वतीने पिंपळे गुरव येथे एकदिवसीय उपोषण

130
0

200पिंपळे गुरव,दि.०१ नोव्हेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यावतीने सुरु असलेल्या लढ्याला आज पाठींबा देण्यासाठी पिंपळे गुरव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने एकदिवसीय साखळी उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते. या उपोषणाला सर्व समाजातील नागरिकांनी पाठींबा दर्शविला.

मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील आरक्षणाच्या लढ्याला सुरुवात केली. या लढ्यामध्ये प्रत्येक मराठा बांधव आपल्या परीने मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यासाठीच पिंपळे गुरव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने या उपोषणाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आपला पाठींबा दर्शविला.

या उपोषणाला पिंपळे गुरव येथील सर्वच समाजाच्या नागरिकांच्या वतीने मोठा पाठींबा देण्यात आला. यावेळी उपोषण करणाऱ्या मराठा बांधवांच्या वतीने ‘एक मराठा, लाख मराठा’, गरजू मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ आशा घोषणा दिल्या.

Previous articleमराठा आरक्षण संदर्भात गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी मुंबईत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
Next articleतामिळनाडूत जसे 69 टक्के आरक्षण आहे त्या धर्तीवर महाराष्ट्रात आरक्षण वाढवून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve − 4 =