पिंपरी,दि. १९ ऑक्टोंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य अधिवेशन ६६ वे आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब लढत आयोजित करण्यात आली आहे. या कुस्ती स्पर्धेत भाग घेण्यासाठी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने सोमवारी (दि.२३) कावेरीनगर क्रीडा संकुल, वाकड येथे पिंपरी चिंचवड निवड चाचणी कुस्ती स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वरिष्ठ माती व गादी विभागाची स्पर्धा होणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे व सरचिटणीस संतोष माचूत्रे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
कुस्तीगीरांची वजने स्पर्धेच्या दिवशी सोमवारी (दि.२३) सकाळी ९ ते ११ या वेळेत क्रीडा संकुलात घेण्यात येतील. वजने झाल्यावर लगेचच कुस्ती स्पर्धेला सुरुवात होईल.
पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या सर्व पदाधिकारी व सभासद तसेच शहरातील कुस्तीगीर, कुस्ती शौकीन, वस्ताद, मार्गदर्शक मंडळी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांनी केले आहे.
वरिष्ठ माती व गादी विभाग – ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ किलो व महाराष्ट्र केसरी किताब लढत साठी ८६ ते १२५ किलो वजन गट आहेत.कुस्तीगिरांनी अधिक माहितीसाठी सरचिटणीस पै. संतोष माचुत्रे ९८२२०४९४८८ यांच्याशी संपर्क साधावा.