Home ताज्या बातम्या प्रजेचा विकास चा दणका…अखेर माय कार शोरूम च्या सीईओ सहित दोन महिलांवर...

प्रजेचा विकास चा दणका…अखेर माय कार शोरूम च्या सीईओ सहित दोन महिलांवर गुन्हा दाखल ; शोरूम आहे की कुंटणखाना…?

0

वाकड,दि.२१ सप्टेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- प्रजेचा विकास चा दणका…अखेर माय कार शोरूम च्या सीईओ सहित दोन महिलांवर गुन्हा दाखल काही दिवसांपूर्वी प्रजेचा विकासने वाकड मुंबई पुणे हायवे लगत असणार्‍या माय कार शोरूम मध्ये विनयभंगाचा प्रकार होत असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती,ती बातमी प्रसिद्ध होताच महिलेला न्याय देण्यासाठी अनेक कार्यकर्ते पुढे सरसावले तर काही मागे सरकले मात्र काही कार्यकर्ते व प्रजेचा विकास च्या पाठपुराव्याला अखेर यश आले.आज २१ सप्टेंबर २०२३ रोजी माय कार शोरूम चे सीईओ सोमन गौडा आमता गौडा पाटील व दोन आरोपी महिला यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गु.रजि. नं. १०८८/२०२३ भादवि कलम ५०९,३५४(अ),३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र पीडित महिला न्यायाच्या प्रतीक्षेत तसेच राज्य महिला आयोग, अल्पसंख्यांक आयोग, लेबर कोर्ट अन्य इतर ठिकाणी ही तक्रारी करण्यात आल्या. मायकर शोरूम मध्ये सर्व मायकर मध्ये ज्या ठिकाणी सीईओ पाटील यांचे वरदस्त आहे, त्यांच्या सुखासाठी काही महिला काम करतात त्यामुळे इतर अन्य महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणी वर आहे.शोरूम चे मालक अशा सीईओ ला पाठीशी घालून कळत नकळत त्यांच्या चुकात सामील असल्याचे चर्चा जोर धरत आहे. अनेक घरातील महिला मुली या शोरूम मध्ये काम करतात त्यांच्या आई-वडील पती इतर घरचे ज्या विश्वासाने कामाला पाठवतात तो विश्वास मायकर शोरूमने गमावला.अनेक महिलांनी तक्रारी केल्या की शोरूम मध्ये असा प्रकार अनेक वर्षापासून चालू आहे त्यामुळे हा नेमका प्रकार शोरूम मध्ये घडतोय मात्र शोरूम चे मालक मूक गिळून गप्प का त्यामुळे संशयाची सुरी ही शोरूमचे मालक अजय गर्ग यांच्यावरही जाते नक्की गाड्या विकण्याचे शोरूम आहे की कुंटणखाना अशी चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.

प्रजेचा विकासची बातमी पाहताच काही पीडित महिला यांनी एकमेकांना संपर्क करून एकत्रितपणे विचार विनिमय करून सीईओ विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. तसेच याआधी एका पीडित महिने हिंजवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केला होता, तर दुसऱ्या पिढीत महिलेला फेक विशाखा कमिटी बनवुन तिची फसवणुक केली आहे.सीईओ वर कारवाई करतो असे विशाखि कमिटीत सांगितले होते. जेने की विशाखा कमिटी ही ज्या विरोधात आहे त्याच्यापेक्षा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे असते मात्र सिई ओच्या पदाच्या वरती असणाऱ्या कोणत्याही पदाचे पदाधिकारी विशाखा कमिटीत नव्हते. तसेच अवघ्या काही महिन्यानंतर पुन्हा तोच प्रकार काही पीडित महिलांनी घाबरून तक्रार देणे टाळले मात्र पिंपरी चिंचवड येथील देहूरोड शहरात राहणाऱ्या पीडित महिलेने पुढाकार घेत आज सीईओ पाटील व आरोपी पीडित दोन महिला या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास खूप टाळाटाळ केल्यानंतरही अखेर पोलिसांना गुन्हा दाखल करून घेणे भाग पडले. टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर वरिष्ठ पोलीस अधिकारी काय कारवाई करणार याकडे संपूर्ण शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. मात्र अनेक वरिष्ठांचे फोन गेल्यानंतर पीडित महिला कोर्टात धाव घेणार हे कळल्यानंतर अनेक राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आरटीआय कार्यकर्ते या सर्वांच्या सहकार्याने आज पीडित महिलेने हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

नेमका काय घडला होता प्रकार

पीडित महिला माय कार शोरूम वाकड मारुती सुझुकी शोरूम येथे सेल्स एक्झिक्यूटिव्ह म्हणून चार महिन्यापासून नोकरीला होती नोकरी जॉईन केल्यापासून शोरूमचे सीईओ पाटील यांचे वागणे पीडित महिलेला वेगवेगळे वाटू लागले विनाकारण ते पीडित महिलेशी बोलण्याचा प्रयत्न व तिला इशारे करून कॅबिनमध्ये बोलावणे तसेच अश्लील नजरेने पाहणे हा प्रकार करत, हा प्रकार पीडित महिलेच्या लक्षात येता. तेथील एचआर वैभव राऊत यांना तिने सांगितले त्यावर एचआर यांनी त्यांना मी बघून घेतो तू लक्ष देऊ नको असे बोलून टाळाटाळ केली. वैभव राऊत यांना वारंवार सांगुन कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे पीडित महिलेचा त्रास सिईओं टिम लीडर महिला व मॅनेजर महिला यांच्या माध्यमातून वाढत गेला शोरूम मध्ये नोकरीला असणारे टीम लिडर महिला व मॅनेजर महिला ह्या पीडित महिलेला म्हणत “तुला काय अडचण आहे, पाटील सरांशी बोलायला” तुझी ते चांगली काळजी घेतील, तुझ्या मुलांचा संभाळ करतील असे पण तुला कोण आहे. त्यांच्यासोबत बोलत जा.. त्यांना भेटत जा… आम्ही पण गेले कित्येक वर्षापासून त्यांच्यासोबत आहे ते आम्हास सांभाळून घेतात तुही त्यांच्यासोबत राहा असे बोलून त्या पीडीत महिलेला पाटील यांच्याकडे जाण्यास दबाव टाकत होते. मात्र पीडित महिलेने मला असल्या गोष्टी आवडत नाही बोलून विरोध केला. व ट्रेनिंग मॅनेजर अरविंद धुळे यांना सांगितले मात्र त्यांनीही पीडित महिलेच्या या गोष्टीकडे लक्ष दिले नाही टाळाटाळ केली टीम लीडर महिला व मॅनेजर महिला यांनी विनाकारण पीडित महिलेला कस्टमर समोर बडबड करणे तिने घेतलेल्या गाडीच्या बुकिंग दुसऱ्यांना ट्रान्सफर करणे त्यानंतर कस्टमरला फोन करून सांगणे. की पीडित महिलेने फ्रॉड केला आहे. असे सांगून पीडित महिलेची बदनामी करत. पीडित महिलेने याबाबत विचारणा केली असता पीडित महिलेचे थंब बंद केले. कंपनीचे मोबाईल सिम कार्ड बंद केले. सदरचचा प्रकार हा त्यांनी नोकरीवर असताना केले. याबाबत एचआर वैभव राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी सगळं व्यवस्थित होईल असे पिडित महिलेला सांगितले.व सीईओ पाटील व दोन्ही महिलांना पाठीशी घालुन सहकार्य केल्याचे पिडीत महिलेनी सांगितले.

जुलै 2023 पासून पीडित महिला काम करत असणाऱ्या मायकर शोरूम पुणे बंगलोर रोड वाकड पुणे येथे कंपनीचे सीओ पीडीएफ महिलेची जवळीक निर्माण करण्यासाठी इशारे करून त्यांच्या केबिनमध्ये बोलवणे तसेच अश्लील नजरेने पाहणे व त्यांना रिस्पॉन्स न दिल्यामुळे दोन महिला एक टीम लीडर व एक मॅनेजर यांच्यामार्फत पीडित महिलेला त्रास देणे व सीईओ पाटीलशी जवळीक निर्माण करण्यासाठी विरोध करत असताना शोरूमच्या कस्टमर समोर विनाकारण बडबड करणे बदनामी करणे असे प्रकार करत असल्याने पीडित महिलेने हिंजवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केला मात्र त्या तक्रार अर्जावर अद्याप पर्यंत कोणतीही दखल न घेता गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सदर प्रकाराला विलंब होत असल्याने पीडित महिलाही तणावात गेली असून एकटी महिला असल्याने ती घाबरलेल्या अवस्थेत आहे. सदरचे प्रकरण मिटवून घेण्यासाठी शोरूम कडून व काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सीईओ पाटील यांना पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे.पाटील यांच्यावर या आधीही महिलांनी आरोप केले आहे,त्या विरोधात तक्रार ही दाखल आहे. व एका राजकीय पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याकडूनही दबाव आणला जात असल्याचे पिडित महिलेने पञकारांशी बोलताना सांगितले. सदरच्या या घटनेमुळे संपूर्ण शोरूम मध्ये चर्चेचे वातावरण बनले आहे. शोरूम चे मालक अजय गर्ग सीईओ पाटील व तसेच दोन महिला व एचआर टीम यांच्यावर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण शोरूमच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. पोलीस अधिकारी संबंधित पीडित महिलेला न्याय देणार का असा प्रश्न संपूर्ण शोरूमच्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.एखादी पीडित महिला न्याय मागण्यासाठी जर कोणाकडे जात असेल तर तिला न्याय ऐवजी तिच्या अब्रूची दिंडवडे काढून तिचे खच्चीकरण केले जाते ती महिला ताट मानेने तिचा न्याय हक्कासाठी लढण्यासाठी खंबीर उभे राहू शकत नाही.असा पूर्ण प्रयत्न केला जातो त्यावेळी हातबल झालेल्या पीडित महिलेने कोणाकडे न्याय मागावा असे प्रजेचा विकासशी बोलताना पीडित महिलेने तिचे मत व्यक्त केले.

Previous articleशिव महापुराण कथा : सनातन भक्तीचे फळ भावी पिढीच्या हिताचे!
Next articleमहिलांसाठी हा गौरवाचा सण असून देशाच्या इतिहासात सुवर्णक्षरानं लिहीला जाणार आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen + 15 =