रावेत,दि.१५ सप्टेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-रावेत पोलीस स्टेशन हद्दीत दि. ०४ सप्टेंबर २०२३ रोजी निर्माण माईन स्टोन साईड वरील बेसमेन्ट मधील पत्र्याच्या रुममध्ये आरोपी दिनेश रामविलास यादव वय २१ वर्षे, रा. माईन स्टोनबेसमेंट मधील पञ्याच्या रुममध्ये मुंबई पुणे हायवे जवळ रावेत ता. हवेली जि.पुणे मुळ रा. बिरैची कला, पोस्ट-खंबा ता. रिघवली, जि.बस्ती, राज्य उत्तरप्रदेश याने साईडवर किरकोळ भांडणाच्या कारणावरून मित्राचा खुन केला.
कामगार विवेक गणेश पासवान याला किरकोळ भांडणाच्या कारणावरुन तोंडावर सिमेंटची वीट ३ ते ४ वेळा मारुन गंभीर जखमी करून जिवे ठार मारून टाकले आहे. सदर घटनेबाबत शिवकुमार घनश्याम प्रजापती वय १९ वर्षे यांनी फिर्याद दिल्याने रावेत पोलीस स्टेशन मध्ये गु.र.नं. ३२८ / २०२३ भा. द. वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी हा पळुन गेल्याने मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो., सह. पोलीस आयुक्त श्री डॉ. संजय शिंदे सो, अपर पोलीस आयुक्त श्री. परदेशी सो.. यांनी गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व आदेश दिल्याने,सदर गुन्हयाचा तपास करीत असताना आरोपी नामे दिनेश रामविलास यादव हा गुन्हा केलेनंतर गेलेले मार्गाचा सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त करुन पाहुन आरोपी हा सेंट्रल चौक देहुरोड येथून एका टॅम्पो मध्ये बसुन मुंबई बाजुकडे गेल्याचे दिसुन आले. त्यानंतर आरोपी याचे मित्र व जवळचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी करीत असताना दि. ०७ सप्टेंबर २०२३ रोजी सपोनि / पी.आर. शिकलगार यांना गोपनीय बातमी मिळाली की, सदर आरोपी शिवाजी चौक ३ कल्याण येथे आहे. अशी माहिती मिळताच रावेत पोलीस स्टेशन तपास पथक रवाना होऊन सदर ठिकाणी जाऊन आरोपीस शिताफीने पकडून रावेत पोलीस स्टेशन येथे आणले.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो.., सह. पोलीस आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे सोो, अपर पोलीस आयुक्त श्री. परदेशी सो., पोलीस उप-आयुक्त श्री. काकासाहेब डोळे, सहा पोलीस आयुक्त श्री. पदमाकर घनवट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / पी आर शिकलगार, सपोनि / विशाल जाधव, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र पन्हाळे, पाहवा / ४२५ कोळगे, पोहवा / ६७५ गायकवाड, पोशि/ नंदलाल राऊन, रमेश तांबे, संतोष तांबे, विजयकुमार बाकडे, रमेश ब्राम्हण, संतोष थवडे व मपोना धाकडे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत