Home ताज्या बातम्या ‘मन की बात’ मुळे समाजासाठी काम करण्याची मिळते प्रेरणा!

‘मन की बात’ मुळे समाजासाठी काम करण्याची मिळते प्रेरणा!

0

चिंचवड,दि.२८ ऑगस्ट २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- ‘‘संकल्प के सूरज चांद पर भी उगते हैं.. ’’ अशा शब्दांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चांद्रयान- ३’ मोहीमेत यशस्वी झालेल्या शास्त्राज्ञांचे कौतूक केले. ‘मन की बात’ मुळे समाजासाठी आणखी सकारात्मक दृष्टीकोनातून काम करण्याची प्रेरणा मिळते, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १०४ व्या भागाचे शक्तीकेंद्र, बूथ आणि मंडलनिहाय लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. काकास इंटरनॅशनल स्कूल, तापकीरनगर येथे आयोजित कार्यक्रमात जगताप सहभागी झाले.
यावेळी चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळूराम बारणे, सांगवी-काळेवाडी मंडल अध्यक्ष विनोद तापकीर, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सविताताई खुळे, ज्योतीताई भारती, माजी स्वीकृत नगरसेवक संदिप नखाते, पुणे नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, ॲड. मंगेश नढे, हर्षद नढे, सोमनाथ तापकीर, रमेश काळे, प्रकाश लोहार, भरत ठाकूर, कैलास सानप, विकास साठे, आकाश भारती, सचिन काळे, पंकज मिश्रा यांच्यासह भाजपा पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

तापकीरनगर येथे टिफीन बैठक…
दरम्यान, काकास इंटरनॅशनल स्कुल, तापकीर नगर येथे प्रभाग क्रमांक २२ व २७ च्या वतीने ‘टिफिन बैठक’ पार्टीचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये ११० हून अधिक लोक उपस्थित होते. सांगवी- काळेवाडी मंडल अध्यक्ष विनोद तापकीर व बजरंग दल वकील आघाडीचे मंगेश नढे यांनी आयोजन केले. भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणे आणि कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी सकारात्मक भूमिकेतून काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासियांसी होणारा सुसंवाद म्हणजे “मन की बात”. आजच्या ‘मन की बात’मध्ये  मोदीजींनी ‘‘चांद्रयान-३’’ मोहीम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांचा गौरव केला. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशी कामगिरी करणाऱ्या इस्त्रोच्या वैज्ञानिकांचा सन्मान केला. तसेच, सप्टेंबर महिन्यात राजधानी दिल्ली येथे  आयोजित करण्यात आलेल्या G – २०  साठी भारत देश संपूर्णपणे तयार असून तब्बल ४० देशांचे राष्ट्राध्यक्ष यामध्ये सहभागी होणार आहेत. ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे असे देखील त्यांनी सांगितले. या कार्यक्रमातून कायमच समाजासाठी… शहरासाठी… आपल्या देशासाठी काम करण्याची आणखी ऊर्जा मिळाते.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Previous articleधक्कादायक प्रकार- गर्भवती महिलेचा विनभंग करत लगट करण्याचा प्रयन्त,व्यवस्थापक चिकुर्डे व उप-अधिक्षक सय्यद यांच्या विरोधात गुन्हा दाखल..
Next articleमुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करुया – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 − twelve =