रावेत,दि.०६ जुलै २०२३ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- रावेत परिसरात गणेश नगर भागात असलेल्या शिंदे वस्ती पाईपलाईन रोड आमराईबाग ते पाईपलाईन रोड असा असणारा नवा रस्ता त्या रस्त्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.चार ठिकाणी रस्ता अडवला गेलाय त्यामुळे रस्ता बनवला जात नाही आहे. पावसाळ्यात नागरिकांचे हाल होतात ही माहिती संबंधित रोडचे काम करणारे ठेकेदार विलास यांना प्रजेचा विकासाचे पत्रकार/संपादक यांनी भ्रमणध्वनीद्वारे रस्त्याची दुरावस्था का आहे आपण रस्ता का करत नाही असे विचारले असता, नागरिकांनी रस्ता अडवला आहे तो पालिकेने हस्तांतरित करून घेतला नाही त्यामुळे तेथील रस्त्याचे काम रखडले आहे असे सांगितले, आदित्य चंद्रकांत भोंडवे, निलेश उर्फ पप्पू बाळू भोंडवे, बहिरट व एन बी भोंडवे यांनी चार ठिकाणी रस्ते अडवले आहेत त्यामुळे तेथील रस्ते करणे शक्य नाही असे संबधीत रस्ते बनवणारे ठेकेदारांनी सांगितले.माञ पावसाळ्यात त्या ठिकाणी खड्डे पडून त्यात पाणी साठते व चिखल होते त्यामुळे तेथील राहणारे रहिवासी व नागरिक तसेच त्या परिसरात मोठ्या प्रमाणावरती स्कीम चालू आहेत काम करणारे कर्मचारी या सर्वांना जीव धोक्यात घालून त्या रस्त्याने प्रवास करावा लागतो इतर वेळेस तर रस्त्यावर ते पूर्णपणे मातीने धूळ साचली जाते तर पावसाळ्यात खड्डे पडून त्या रस्त्यात गाळ बनला जातो त्यातूनच गाड्या व पाईप्रवास नागरिकांना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदार जो आहे, तेवढ्या रस्त्यावर जर डांबर टाकले तर कमीत कमी नागरिकांची गैरसोय होणार नाही ह्याची काळजी घ्यावयास हवी होती माञ ठेकेदारांनी अडवणूक करणाऱ्या नागरिकांची नावे सांगून रस्ता करण्यास टाळाटाळ करत आहेत व खड्डे पडलेल्या रस्त्यावर मुरूम टाकून जातात पुन्हा पाऊस पडला की त्या मुरमाची माती गाळ होते पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते जर रस्ते पालिकेने हस्तांतरितच केलेले नाहीत तर महानगरपालिकेने त्या रस्त्याचे टेंडर काढले कसे असा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.संबंधित महानगरपालिका व पालिकेचे कर्मचारी व ठेकेदार याचे उत्तर नागरिकांना देतील का कारण जो रस्ता बनवला जाणार नाही तर त्याचे टेंडर कसे,महानगरपालिकेतील हद्दीत राहणारे रहिवासी जो टॅक्स पे करतात त्या टॅक्स पे मधून रस्ते विकासाची कामे केली जातात मात्र अशी बिकट परिस्थिती बघून ज्या रावेत परिसराकडे विकासात्मक परिसर म्हणून बघितले जाते माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या मॉडेल विकासातील वार्ड म्हणून पाहिले जाते मात्र त्याच वार्डात जर अशी परिस्थिती असेल तर लोकप्रतिनिधी व महापालिकेचे कर्मचारी ठेकेदार या सर्वांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तो जेवढा रस्ता आहे तो रस्ता तरी बनवला जाईल का? नागरिकांची जी गैर सोय होते ती दूर होईल का असा प्रश्न तेथील संतप्त नागरिकांकडून निर्माण केला जात आहे.माञ बोलायचे कसे सर्व एकमेकाची भावकी दुशमनी कोण घेणार अशा अनेक चर्चा परिसरात नागरीक करत आहेत. माञ कुणाचा जीव गेल्यावर पालिका प्रशासनाला जाग येणार का? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आपण नागरिकांच्या या प्रश्नाकडे लक्ष द्याल का? संबंधित अधिकारी व ठेकेदार हे नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन रस्ता तयार करतील का ज्या लोकांच्या जागेत रस्त्याच्या आरक्षण आहे तो रस्ता हस्तांतरित करून घेतील का? त्यासाठी ही महापालिका व संबंधित जागा मालक यांचा संघर्ष पाहायला मिळणार आहे का असे अनेक प्रश्न निर्माण होत त्यावर संपूर्ण रावेत परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती व्हावी व रस्ता नागरीकांना खुला व्हावा . नागरीक मोठ्या संख्येने ये जा करतात परंतु या चार ठिकाणी उर्वरीत कच्च्या रस्त्यामुळे नागरिकांचे हाल होतात. महापालिकेने तातडीने नवीन रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात मोठा त्रास होतो. रस्त्यावर पाणी जमा होते. प्रवास करणे अवघड होते. गाडी स्लिप होणे आता नित्याचे झाले आहे. या प्रश्नाकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष द्यावे.रस्ते पुर्ण होई पर्यंत ठेकेदाराची बिले पालिकेने अदा करु नयेत.व संपुर्ण रस्त्याची पहाणी करुन घ्यावी.
Home ताज्या बातम्या रावेत परिसरात रस्त्याची दुरावस्था नागरिकांच्या जीवाशी खेळ आयुक्त साहेब तातडीने लक्ष द्याल...