Home ताज्या बातम्या माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट उघड,आरोपींना अटक

माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट उघड,आरोपींना अटक

143
0

पुनावळे,दि. २८ जुन २०२३ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-नुकत्याच पार पडलेल्या चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत ज्यांचा विषय गाजला राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट उघड खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या टीमने त्यांच्या बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार पुनावळे येथे मोठा गंभीर गुन्हा करण्यासाठी काही आरोपी येत आहेत हे समजताच सापळा रचून गुन्हा घडण्याआधीच आरोपींना ताब्यात घेतले मात्र तपासादरम्यान आरोपींनी शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचला असल्याची माहिती पोलिसांना दिली.

खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई ०३ सराईत गुन्हेगारांना पिस्टल व रांऊडसह केली अटक,मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगुन गुन्हा करणाऱ्या इसमांची माहिती काढून, त्यांचे विरुध्द कडक कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
त्यानुसार गुन्हेशाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे व अंमलदार हे दिनांक २४जुन २०२३ रोजी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढत असतांना, पोलीस नाईक आशिष बोटके व प्रदीप गोडांबे यांना बातमी मिळाली की, सराईत गुन्हेगार किशोर भोसले व अमित पाटुळे हे कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने, पुनावळे येथील स्मशान भुमी येथे येणार असून, त्यांचेकडे पिस्टल आहे. त्यावर खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून, १) किशोर बापू भोसले वय ३१ रा. पुनावळे गावठाण, ता. मुळशी, जि. पुणे २) अमित दत्तात्रय पाटुळे वय २३ रा. शिंदेवस्ती चौक, रावेत, पुणे यांना ताब्यात घेतले, त्यांच्या ताब्यातुन ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात कर. त्यांच्या विरुध्द रावेत पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर २६८ / २०२३, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास दरम्यानत्यांनी सदरचे पिस्टल व राऊंड हे अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले राहणार पुनावळे, गावठाण, पुणे याचे सांगणेवरुन, तडीपार आरोपी रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार याचेकडून आणले असल्याचे सांगितले. खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले वय ३४ रा. पुनावळे गावठाण, पुणे याचा शोध घेवुन त्यास तात्काळ अटक केली. खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद पवार व सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे यांनी आरोपी अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले याचेकडे सखोल व कौशल्यपुर्ण तपास केला असता, माथाडीच्या कामावरून वर्चस्वाचा वाद सुरू झाला गोरगले व त्याचे साथीदार भोसले पाटुळे यांचा इगो जागा झाला त्यांची दहशत संपल्यासारखे त्यांना वाटले ओव्हाळ व त्यांचे काही नातेवाईक मित्रमंडळी यांच्या जागेत काम सुरू असल्याने तेथील माथाडीचे कामे त्यांना मिळावेत असा त्यांचाही आग्रह त्यामुळे काम घेण्याच्या वादावरून दहशत कमी होण्याची भीती आरोपी किशोर भोसले अमित पाटोळे व गोरगले यांना वाटली त्यामुळे त्यांनी थेट शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचला असल्याचे समजले.
माथाडीचे कामावरुन झालेल्या वादातून ठराविक उद्देश साध्य करण्याचे हेतूने आरोपी अमोल गोरगले याने साथीदारांकरवी पिस्टल व राऊंड आणले असल्याचे निष्पन्न झाले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सपोनि उध्दव खाडे हे करीत आहेत.

अटक आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन, त्याचे विरुध्द हिंजवडी व वाकड पोलीस ठाणे येथे दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करणे असे गुन्हे दाखल आहे.सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, मा.वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, मा. सतिश माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा. पोलीस उप-निरीक्षक अशोक दुधवणे, अमर राऊत तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, रमेश मावसकर, किरण काटकर, सुनिल कानगुडे, प्रदीप गायकवाड, रमेश गायकवाड, ज्ञानेश्वर कुन्हाडे, सुधीर डोळस यांचे पथकाने केली आहे.

Previous articleविकासनगर भागात छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त महिला रोजगार व मार्गदर्शन मेळावा संपन्न
Next articleसागरी सेतूला सावरकर यांचे नाव तर महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे एकत्रिकरण, अनेक निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता व रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve + 8 =