चिंचवड,दि.२२ फेब्रुवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणांच्या हालचालींना वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिट्टी देत शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. देवेंद्र तायडे यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी आज प्रवेश करताना सोबत होते. देवेंद्र तायडे हे राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर त्यांनी जड अंतकरणाने वंचित बहुजन आघाडीच्या काही दोन नेते कार्यकर्त्यांमुळे शहराची वंचित बहुजन आघाडी ही फुटीच्या उंबरठ्यावर आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी मध्ये अनेक कार्यकर्त्यांची घुसमट सुरू आहे वंचित बहुजन आघाडी संपवण्याचा डाव वंचित बहुजन आघाडी मधील काही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे जवळचे लोक म्हणून स्वतःला सांगत करत आहेत.त्यातील काही लोक वंचित बहुजन आघाडी मध्ये सतत एकमेकांमध्ये वाद कसे राहतील यासाठी प्रयत्न करत असतात अशा अनेक कारणांनी मागे वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देवेंद्र तायडे यांनी दिला होता.मात्र तो राजीनामा अजूनही मंजूर झाला नाही, पण राजकीय काराकीर्द आणि राजकीय शहरातील राजकारण पाहता नागरिकांच्या व शहराच्या विकासाच्या हेतूने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर अगदी बाळासाहेब आंबेडकरांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून वकिली करत असणारे अॅड.मिलिंद कांबळे यांनी यांच्या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजवर अत्यंत जड अंतकरणाने व दोन लोकांमुळे वंचित बहुजन आघाडी सोडत असल्याचे जाहीर केले. व तसेच आज तायडे साहेब व मी मिलिंद कांबळे वंचित बहुजन आघाडी सोडत आहोत, असे जाहीर केल्याने पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आणि अद्याप काही तासातच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला. वंचित बहुजन आघाडीने नुकताच अपक्ष उमेदवार शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला होता.मात्र २०१९ च्या निवडणुकीच्या अनुभव घेता शहरातील वंचित बहुजन आघाडीचे नेते पदाधिकारी नाराज होते पण काही लोकांमुळे वंचित बहुजन आघाडीत उलट सुलट चर्चांना सुरुवात झाल्याने नेते कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीच्या मधून बाहेर पडण्याचा प्रयत्नात आहेत.त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांची सभा असल्याने बाळासाहेब आंबेडकर गंभीर दखल घेतील का? याकडे वंचित बहुजन आघाडी मधील सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. त्यातल्या त्यात वंचित बहुजन आघाडी मधील ती दोन लोक कोण आहेत त्यातील एक तर बाळासाहेब आंबेडकर यांच्या नातेवाईक आहे व एक मोठ्या पदावर आहे अशी चर्चा शहरात रंगली आहे अनेक चांगले कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत.देवेंद्र तायडे यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी असा एकनिष्ठ प्रवास केला होता पण अचानक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने वंचित बहुजन आघाडी मधील कार्यकर्त्यांची घुसमट हे दिसून आली आहे.राहुल कलाटेंना पाठिंबा दिल्याने वंचित मध्ये फुट पडल्याचे बोलले जात आहे.
Home ताज्या बातम्या BREAKING NEWS :: वंचितला मोठा धक्का शहरध्यक्ष देवेंन्र्द तायडे यांचा राष्ट्रवादीत...