Home ताज्या बातम्या किवळे, मामुर्डी रावेतमध्ये भाजप जोमात; अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा पदयात्रेद्वारे “डोअर टू डोअर” प्रचार

किवळे, मामुर्डी रावेतमध्ये भाजप जोमात; अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा पदयात्रेद्वारे “डोअर टू डोअर” प्रचार

82
0

चिंचवड,दि.२० फेब्रुवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. शहराच्या इतर भागापेक्षा चिंचवड मतदारसंघात झालेला विकास भाजप आणि आमदार लक्ष्मण जगताप यांचे व्हिजन सांगणारे आहे. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप या मतदारसंघाच्या विकासाला आणखी गती देतील. त्या एक सक्षम महिला आहेत. त्यामुळे अश्विनी लक्ष्मण जगताप यांना निवडून देण्याचा निर्धार किवळे व रावेत परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांनी रविवारी (दि. १९) केला.

चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजप, शिवेसना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी रविवारी सकाळी किवळेगाव, साळुंखे वस्ती येथील बुद्धविहारात गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन पदयात्रेला सुरूवात केली. त्यांनी बापदेव महाराज मंदिर, भैरवनाथ मंदिरात दर्शन घेतले. यावेळी आमदार उमा खापरे, प्राधिकरणाची माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर आर. एस. कुमार, माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, बाळासाहेब ओव्हाळ, आप्पा बागल, माजी नगरसेविका संगीता भोंडवे, माजी सरपंच सुदामराव तरस, शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश तरस, राजेंद्र तरस, गोरख तरस, नवनाथ लोखंडे, अनिल चव्हाण, संदिप काळे, सुधीर तरस, चंद्रकांत तरस, दशरथ साळुंखे, सुधीर साळुंखे, दिपक तरस, नितीन कुऱ्हाडे, हंबीरराव आवटे, भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या भगिनी साठे, मोहनराव कदम, आरपीआयचे दिलीप कडलक, गौतम गायकवाड, शिवशरण, अलका पांडे, सुनीता चांदणे, दिलीप राऊत, सचिन राऊत, नवनाथ राऊत, लतिका ओव्हाळ, शुभांगी वानखेडे, निता चव्हाण, गणेश झेंडे, नवनाथ जांभुळकर, संजय तापकीर आदी उपस्थित होते.

अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी किवळे, मामुर्डी आणि रावेतमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या आशिर्वादाने देशाला महासत्ता बनवण्यासाठी जोरदार पावले टाकली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक क्षेत्रात देशाची प्रगती होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनीही चिंचवड मतदारसंघाची ओळख विकासकामांचा मतदारसंघ म्हणून निर्माण केली आहे. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग झाला. त्याचा फायदा किवळे आणि रावेत भागातील नागरिकांना होत आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपने केलेली विकासकामे जनतेच्या डोळ्यासमोर असून “कमळ” हे चिन्ह विकासाचे प्रतिक असल्याचे अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी नागरिकांना सांगितले. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या विकासकामांमुळे जनतेचा प्रवास व जगणे सुसह्य झाले आहे. विकासाचा हा रथ असाच दौडत ठेवण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपचा विजय होणे महत्त्वाचे असल्याचे अश्विनी लक्ष्मण जगताप म्हणाल्या. येत्या २६ तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून विकासाची नाळ घट्ट करावी, असे आवाहन अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी नागरिकांना केले.

Previous articleचिंचवड पोटनिवडणुक-सिद्दीक शेख यांचा नोटराइज्ड जाहिरनामा सादर तर भल्याभल्यांच्या बत्या गुल
Next articleनरेंद्र मोदींप्रमाणेच लक्ष्मण जगतापांनी केला विकास, एक मत विकासाची परंपरा सुरू ठेवण्यासाठी द्या; सर्वात तरूण खासदार तेजस्वी सूर्याचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen + sixteen =