Home ताज्या बातम्या साईनगर भागात पाण्याची चोरी,पि.चि.मनपा हद्दीतील पाईपलाईन मधुन गंहुजे ग्रामपंचायत मधील प्रकार

साईनगर भागात पाण्याची चोरी,पि.चि.मनपा हद्दीतील पाईपलाईन मधुन गंहुजे ग्रामपंचायत मधील प्रकार

127
0

साईनगर,दि.०५ डिसेंबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक १६ मधील साईनगर भागात शेजारी चिटकून असलेल्या गंहुजे ग्रामपंचायत येथील काही लोकांनी मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या पाणीपुरवठा होत असलेल्या पाईपलाईन मधून होल मारून चोरून नळ कनेक्शन घेतले आहे.संबंधित हा प्रकार रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात घडत असून त्यामुळे महापालिका हद्दीच्या रहिवाशांना पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे.त्यामुळे पुढे पाण्याची समस्या महापालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्भवू शकते.अशा चोरून नळ कनेक्शन घेतलेल्या लोकांवर महापालिकेने कारवाई करावी तसेच गहुंजे ग्रामपंचायतीला समज देऊन ग्रामपंचायत वरही कारवाई करावी आणि साईनगर भागात महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांना जास्त प्रमाणात पाणीपुरवठा कसा होईल याकडे लक्ष द्यावे या अनाधिकृत नळजोड घेतलेल्या लोकांवर महापालिकेने लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षाकडून महापालिकेच्या दालनामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शाखा व्यवस्थापक तथा विभाग गट प्रमुख जेयन नायर यांनी पालिकेला दिला आहे ताबडतोब अशा लोकांवर कारवाई करावी यासाठी महापालिकेला पत्रव्यवहारही जेयन नायर शाखा व्यवस्थापक व कैलास करमारे उपाध्यक्ष- पिंपरी चिंचवड वाहतूक सेना यांनी पत्र दिले आहे.

दिवसाआड पाणी येत असल्याने आधीच नागरिक त्रस्त आहेत त्यामध्ये असे चोरून नळ कनेक्शन घेतल्याने पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे भविष्यात साईनगर भागातून उग्ररूप धारण होऊ शकते त्यामुळे ताबडतोब याकडे लक्ष देऊन महापालिकेने कारवाई करावी संपूर्ण साईनगर परिसरात महापालिका काय कारवाई करणार याकडे संपूर्ण प्रभाग क्रमांक १६( विकास नगर किवळे मामुर्डी साईनगर रावेत)चे लक्ष लागून आहे.

Previous articleचिंचवड येथे ३९ वर्षीय गिड्या उर्फ विशाल गायकवाड याची भर चौकात हत्या,मारेकरी होते कोण?
Next articleबाळासाहेबांची शिवसेना पक्षाची कार्यकणी जाहिर,पिंपरी चिंचवड शहरध्यक्ष पदी निलेश तरस तर युवासेना शहर संघटकपदी राजेंद्र तरस यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three + 3 =