Home ताज्या बातम्या नगरपालिका-महापालिकांच्या निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन

नगरपालिका-महापालिकांच्या निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन

0

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग घेणार

मुंबई,दि.२८ ऑक्टोबर २०२२(प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी) : – राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार आहे असे काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Previous articleचिंचवड विधानसभा मतदारसंघातील रेशनकार्डधारकांना भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप
Next articleचिंचवडच्या पवना घाटावर उत्तर भारतीय कुटुंबांकडून छटमाईची पूजा आणि भक्तिभावाने सुर्योपासना…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − one =