Home ताज्या बातम्या विकासनगर-किवळे मध्ये भटक्या कुञ्यांचा सुळसुळाट, मोकाट कुञ्यांची अचानक संख्या वाढली- नागरिक, लहान...

विकासनगर-किवळे मध्ये भटक्या कुञ्यांचा सुळसुळाट, मोकाट कुञ्यांची अचानक संख्या वाढली- नागरिक, लहान मुलांमध्ये दहशत

100
0

विकासनगर किवळे,दि.१० जुलै २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- नागरिक, लहान मुलांमध्ये दहशत मिनाकाॅलनी,पेडंसेकाॅलनी विकासनगर किवळे प्रभाग क्र-२४ पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून यामुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरातील कचराकुंड्या, रस्त्यावर, मंदिर परिसर, शाळा पटांगण, सोसायट्यांच्या आवारात सर्वत्र या मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी कमालीचे त्रस्त झाले आहेत. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असून श्वान निर्बिजीकरण मोहिमेनंतरही मोकाट कुत्र्यांची संख्या कमी झालेली नाही.उलट मिना काॅलनी पेडंसे काॅलनी मध्ये अचानक भटक्या व मोकाट कुञ्यांची संख्या वाढली कशी हा चर्चेचा विषय होत आहे.मिना काॅलनी, पेडंसे काॅलनी शिंदे पेट्राॅल पंप ते मिना काॅलनीतील चर्चजवळ आणि आजूबाजूच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे कुत्रे रात्री उशिरा येणाऱ्या नागरिकांना व दिवसा खेळणार्‍या लहान मुलांनाही लक्ष्य करीत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. अनेकदा शाळकरी विद्यार्थी,लहान मुले व काही महिला वर्ग या मोकाट कुत्र्यांना पाहून घाबरून पळतात. पळणाऱ्या लहान मुले व नागरिकामागे कुत्र्यांकडून पाठलाग केला जात असल्यामुळे सर्वांन मध्ये भीतीचे वातावरण आहे. या कुत्र्यांच्या भीतीपायी विद्यार्थी शाळेत जाण्यास व नागरिक माॅर्निंग वाॅक,किंवा किरकोळ खरेदी करण्यासाठी जाण्यास टाळाटाळ करीत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. या भटक्या कुत्र्यांचा कायमचा बिमोड करण्याची मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.भटक्या कुत्र्यांमुळे समस्या त्यात आता या भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. फिरायला येणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन फिरावे लागत आहे.परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे,त्यात दुसऱ्या भागातील माणसे येऊन उरलेले जेवण सुधा काॅलनीतील चालु बांधकाम असणार्‍या इमारत परिसरात किंंवा रस्त्याच्या कडेला येऊन टाकतात,त्यामुळे सगळे कुत्रे एकत्र परिसरात जमा होतात आणि रहिवाश्यांना त्रास होत आहे,त्यांना सांगून सुधा ते याची दखल घेत नाही,तर पालिका प्रशासन याची दखल घेईल का?असा सवाल नागरिंकांन मधुन येत आहे.राञीच्या वेळी कुञ्यांंचा मोठा गोंगाट चालतो अचानक मोकाट कुञ्यांची संख्या वाढल्यांने त्यांचातही कवंडळ होते.तर काही सोसायट्यांन मध्ये मोकाट भटकी कुञी येऊन घाण करतात त्या दुर्गंधीचा ही सामना नागरिकांना करवा लागत आहे.लहान पाळीव प्राणी मांजर,कोबंड्या,व पाळीव पक्षी हे ही या मोकाट कुञ्यांचे शिकार होत आहे.प्राणी मिञ,भावी नगरसेवक,माजी नगरसेवक,सामाजीक कार्यकर्ते हे माञ मुक गिळुन बसले आहेत.त्यांना ही समस्या दिसत नाही.नागरीक भयभित असुन भटक्या कुञ्यांची दहशत माञ वाढत आहे.त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा नागरीकांना आहे.व कुञ्यांच्या दहशतीची चर्चा माञ जोर धरत आहे.

Previous articleमहापालिका आयुक्तांच्या निर्णयाला विरोध; निर्णय मागे घेण्याची मागणी – अजित गव्हाणे
Next articleहर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 5 =