Home ताज्या बातम्या ७ हजारांहून अधिक गाणी लिहणार्‍या,पहाडी अवाजाचा बादशाह का. प्रतापसिंग बोदडे दादांना पिंपरी...

७ हजारांहून अधिक गाणी लिहणार्‍या,पहाडी अवाजाचा बादशाह का. प्रतापसिंग बोदडे दादांना पिंपरी चिंचवड शहरात आनोखे राज्यस्तरीय अभिवादन सभेचे आयोजन

106
0

पिंपरी, दि. १७ जून २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- महाराष्ट्र भूषण,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण, पहाडी आवाजाचा बादशहा मानवमुक्तीच्या लढ्याचे प्रणेते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनसामान्य तळागाळातील चळवळीतील लोकांपर्यंत भिमगीतांचा माध्यमातुन लेखन गायन व प्रबोधनातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व धम्म प्रसार प्रचार करण्याचे कार्य भीमशाहीर प्रतापसिंग बोदडे यांनी केले.३ जून रोजी मात्र काळाने घाला घातला आणि हा पहाडी आवाज काळाच्या पडद्याआड गेला.आशा ह्या स्वर बादशहाला आदरांजली वाहण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात राज्यस्तरीय अनोखे अभिवादन सोमवार दिनांक २० जून २०२२ रोजी सकाळी ११.००वा ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत पिंपरी-चिंचवड येथे आचार्य अत्रे रंग मंदिर पिंपरी या ठिकाणी करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी दि.१६ रोजी पञकार परिषद घेण्यात आली

महाकवी वामनदादा कर्डक यांच्यासोबत त्यांनी साथ-संगत केली. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. ख्यातनाम कवी, गायक, कव्वाल, शाहीर अशी त्यांची ख्याती होती.भिमराज की बेटी मै तो जयभीम वाली हूँ’, ‘महूँ के बच्चे में एक बच्चा’, ‘माझ्या भीमाची नजर’ पाणी वाढ ग माय, माझ्या भिमाची कमाई,भिम कीर्ती,तुझ्या पाऊलखुणा भीमराया,थांबा हो थांबा गाडीवाले दादा,मेरा भीम जबरदस्त है, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमी वर, मेरा भिम जबरदस्त है अशा अनेक प्रसिध्द भीमगीता मधून उपेक्षित, वंचित तळागाळातील समूहाला जागृत करण्याचे काम करणारे लोकशाहीर आणि भीम युगाचे वारसदार प्रतापसिंग बोदडे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सर्वांमध्ये प्रताप दादा म्हणून परिचित असलेले बोदडे दादा यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषेवर प्रभुत्व होते. लोककवी वामनदादा कर्डक यांचे पट्टशिष्य होते प्रतापसिंग बोदडेदादा यांनी भीमगीतांचे शेकडो कार्यक्रम सादर केले. दादांची शब्दांची फेक आणि गाण्याची लकब अप्रतिम होती. आंबेडकरांचं महान कार्य आपल्या लेखणीतून त्यांनी सर्व समाज स्तरावर पोहोचवलं. आंबेडकरी चळवळीशी प्रामाणिक राहात प्रबोधनाचं कार्य करणारे, आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता घडवणारे आणि ही चळवळ जोमाने पुढे नेणारे कालकथित बोदडेदादा यांचे स्मृतिप्रीत्यर्थ अनोखे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी गायिका प्रज्ञा इंगळे, गायिका साधना मेश्राम, संतोष जोगदंड,श्याम सोनवणे, विशाल ओव्हाळ, धम्मराज साळवे,धीरज वानखेडे, मुन्ना भालेराव, संकल्प गोळे, अमर पुणेकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेमध्ये या अनोख्या राज्यस्तरीय अभिवादनाचा कार्यक्रमाची माहिती देण्यात आली व संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासह महाराष्ट्रातील तमाम चळवळीतील कार्यकर्त्यांना या अभिवादन सभेला उपस्थित राहण्यासाठी समितीच्यावतीने गायिका प्रज्ञा इंगळे व गायिका साधना मेश्राम यांनी आवाहन केले. कालकथित प्रतापसिंगदादा बोदडे अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय प्रशासकीय राजकीय धार्मिक सामाजिक सिनेकलावंत कलावंत भिम शाहीर अशा अनेक दिग्गज मान्यवर येणार आहेत. आंबेडकर चळवळीतील कवी, गायक, कालवश प्रतापसिंग दादांच्या गीत गाऊन अभिवादन करणार आहेत दादांबद्दल सम्यक माहिती तसेच दादांच्या प्रबोधनपर गीतांवर आधारित दिशा दाखवणारे व्याख्यान होणार आहे. यावेळी शाहीर डी.आर. इंगळे (बुलढाणा – विदर्भ), डॉ. मिलिंद बागुल (जळगाव – खान्देश), डॉ.सत्यजित कोसंबी (कोल्हापूर) यांचे व्याख्यान होणार आहे. आंबेडकरी चळवळीची नवी गीते आणि कवीता कशा असाव्यात याबाबत मार्मिक मार्गदर्शन सहभागी व्याख्याते करणार आहेत. प्रतापसिंगदादा बोदडे अभिवादन समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने संपूर्ण अभिवादन कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले आहे.

शेवटच्या श्वासापर्यंत लेखन
आंबेडकरी चळवळीचे सांस्कृतिक आधारवड हरपल्याची भावना संपूर्ण आंबेडकरी बहुजन समाजात आहे. प्रतापसिंग यांनी आत्तापर्यंत ७ हजारांहून अधिक गाणी लिहिली व स्वरबद्ध केली आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले.मुक्ताईनगरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रतापसिंग बोदडे यांना मृत्यूनंतर जीवनगौरव पुरस्कार मानपञ देण्यात येणार आहे.ते स्वीकारण्यासाठी का. प्रतापसिंग बोदडे दादांचे चिरंजीव कुणाल बोदडे सहपरिवार उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड शहरातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते यांनी एकत्र येत लोकवर्गणीतून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे दिवसभर हा कार्यक्रम चालणार असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोककलावंत व चळवळीत काम करणाऱ्या सर्वांपर्यंत वामनदादा कर्डक तसेच कालवश प्रतापसिंग दादा बोदडे यांच्या लेखणीतील धम्म प्रचार प्रसाराचे आठवणींचा उजाळा करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे आपण सर्वांनी या अभिवादन सभेमध्ये सामील होत कालवश प्रतापसिंगदादा बोदडे यांना अभिवादन करून इतिहासाचे साक्षीदार बनवूया

Previous articleकिवळे-शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे जय्यत स्वागत…
Next articleदहावी बारावी नंतरच्या करिअरच्या संधी वर मार्गदर्शन वेळोवेळी होणे गरजचे-दिपक भोंडवे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × four =