Home ताज्या बातम्या BIG BREAKING News – २ आठवड्यात निवडणूका जाहीर करा, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा...

BIG BREAKING News – २ आठवड्यात निवडणूका जाहीर करा, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

0

नवी दिल्ली,दि.०४ एप्रिल २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याबाबत सुप्रीला कोर्टाने आदेश दिले आहे. राज्य निवडणूक आयोगाने येत्या दोन आठवड्यात निवडणूक जाहीर करा असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होऊ देणार नाही असे सांगत विरोधी पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यास विरोध केला होता. तर राज्य सरकारनेही ओबीसी आरक्षण लागू होत नाही तोपर्यत निवडणूका घेणार नाही अशी भूमिका घेतली होती.राज्यात पिंपरी- चिंचवड,पुणे,मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद यासह एकूण १८ महानगरपालिकांची मुदत संपली आहे. या ठिकाणी राज्य सरकारने प्रशासक नेमले आहेत. या स्थानिक स्वराज संथांच्या निवडणूक घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिक दाखल करण्यात आली होती.यावर आज निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने येत्या दोन आठवड्यात निवडणूक जाहीर करावी असे निर्देश निवडणुक आयोगाला दिले आहेत. कोर्टाच्या आदेशाचे पालन केलं जाईल असे राज्य निवडणूक आयोग आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी सांगितले.

Previous articleराज ठाकरे म्हणाले, ४ मे पासून मशिदींवर लाऊडस्पीकर वाजवले तर हनुमान चालीसा दोन दुहेरी आवाजात होईल.
Next articleमाजी नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांचा इशारा-पुनावळे ते मुकाई चौक परिसरातील बांधकामावर कारवाई होऊ देणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 2 =