चिंचवड,दि.17 एप्रिल 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- 14 एप्रिलचा दिवस सर्व पोलिस प्रशासन बंदोबस्तात व्यस्त असताना.मोकळ्या मैदानात काही गुंड आपसात वाद करत होती.पोलिस शिपाई ला कळताच सोडवण्यासाठी गेले असता त्याच पोलिसाला मारहाण झाली.हि घटना दळवी नगर झोपडपट्टी परिसरातील मोकळ्या मैदानात रात्री पाऊने नऊ वाजता दरम्यान घडली आहे. दळवी नगर झोपडपट्टी जवळच्या मोकळ्या मैदानात काहीजण हातात हत्यारे घेऊन आपापसात भांडण करत होते. त्यावेळी पोलीस शिपाई उमेश देवीचंद वानखेडे हे स्थानिक गाव गुंडाचं भांडण सोडवायला गेले.
मात्र पोलिस शिपाई वानखेडेनांच गाव गुंडाच्या टोळक्याने जबरदस्त मारहाण केली आहे. उमेश वानखेडे ह्यांनी गाव गुंडांना मी स्वतः पोलीस असल्याचं सांगून सुद्धा गाव गुंड आरोपींनी पोलीस शिपाई उमेश वानखेडे यांना दगड व लाथा – बुक्क्यांनी मारहाण करत, शिवीगाळ करून जखमी केल आहे. चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई उमेश वानखेडे ह्यांचा फिर्यादीवरुण प्रीतम उर्फ बिक्षू नंदू आवतारे, गौरव उर्फ कैची ज्योतीराम जोगदंड आणि आकाश शिवाजी अवतारे या तिन्ही आरोपींन विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना चिंचवड पोलीसांनी अटक केली आहे.पुढील तपास चिंचवड पोलिस करत आहेत