Home ताज्या बातम्या अखेर प्रभागरचना रद्द ; निवडणुका लांबणीवर

अखेर प्रभागरचना रद्द ; निवडणुका लांबणीवर

0

पिंपरी,दि.१४ मार्च २०२२ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):– पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेली तीन सदस्यीय पद्धतीची प्रभाग रचना रद्द करण्यात आली आहे . राज्य शासनाने त्याबाबतची अधिसूचना जारी केली . त्यामुळे आता पुन्हा नव्याने प्रभाग रचना होणार, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने २०२२ च्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार केली होती. अगामी निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा १ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रसिद्ध केला होता . ३ सदस्यांचे ४५ आणि ४ सदस्यांचा १ प्रभाग होता . या प्रभाग रचनेवर १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हरकती मागविल्या होत्या . या हरकतींवर २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात आली . दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळला .राज्य शासनाने ओबीसी आरक्षणाचे विधेयक विधानसभा आणि विधानपरिषदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर केले . प्रभाग रचना , निवडणूकांच्या तारखा ठरविण्याचे अधिकार सरकारकडे घेतले . त्या विधेयकावर राज्यपालांनीही स्वाक्षरी केली . त्यानुसार अधिसूचना प्रसिद्ध करत शासनाने तीनसदस्यीय प्रभाग रचना रद्द केली आहे .
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले , ” शासनाचे आदेश येतील . त्यानुसार निवडणुकीबाबतची पुढील कार्यवाही केली जाईल ”
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची प्रभागरचना अखेर रद्द करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरूवात झाली होती.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी ३ सदस्यांची प्रभागरचना तयार करण्याचे काम पूर्ण झाले होते. अशातच सोमवारी राज्य सरकारने काढलेल्या आदेशामुळे प्रभागरचना पुन्हा एकदा रद्द झाली आहे. प्रारुप प्रभाग रचना अंतिम मानून निवडणुकीच्या तयारीला लागलेल्यां सर्वाचीच माञ डोकेदुखी वाढली आहे. आता नव्याने प्रभागरचना करताना इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षण टाकले जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचे आरक्षण कायम असावे अशी भूमिका राज्यातील सर्वच पक्षाने घेतली आहे. त्यामुळे नुकताच विधिमंडळात नवीन कायदा पारित झाला. त्यास राज्यपालांनी देखील मंजुरी दिली आहे. या कायद्यात निवडणूक घेण्याबाबत व प्रभागरचना करण्याचे अधिकार शासनाने स्वतःकडे घेतले आहेत त्यानुसार ही प्रभाग रचना रद्द झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. निवडणूक आयोगाने या आदेशानुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश सर्व महापालिका सोबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला ही दिले होते. स्वतःच्या सोयीचा प्रभाग तयार करून घेण्यासाठी नगरसेवकांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. महाराष्ट्र शासनाने काढलेल्या राज्य पत्रामध्ये पुणे महापालिकेस राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती यांचीही प्रभाग रचना रद्द केलेली आहे. या आदेशामुळे भविष्यात पुन्हा एकदा तीन सदस्यांचा प्रभाग रचना करण्यासाठी निवडणूक आयोगाला पुन्हा तयारी करावी लागणार आहे. आत्ताची प्रभाग रचना रद्द झाल्याने महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे माञ स्पष्ट झाले आहे.

Previous articleदिपकभाऊ मधुकर भोंडवे आयोजीत नोकरी महोत्सवात 1500 उमेदवारांचा सहभाग 800 जणांना ऑफर लेटर
Next articleकिवळे-आदर्श उपक्रम ; एक गाव एक शिवजंयती चे आयोजन सर्वाना सहभागी होण्याचे अव्हान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + eighteen =