किवळे-रावेत,दि.०१ मार्च २०२२ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- माघ वद्य चतुर्दशीला म्हणजेच ०१ मार्च२०२२ रोजी महाशिवरात्री साजरी करण्यात येत आहे. भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आज देशभरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते.तसेच आज विकासनगर किवळे मामुर्डी रावेत प्रभाग क्रं-२४ चे युवा नेते दिपकभाऊ मधुकर भोंडवे यांच्या वतीने देहुरोड पोलिस स्टेशन जवळ सेंट्रल चौक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.घोरावडेश्वर ला जाणारे शिवभक्तांनची सेवा करता यावी म्हणुन शाबुदाणा खिचडी,फराळ व सरबत चे वाटप करण्यात आले.दिवस भर हजारो भाविकांनी प्रसादाचा आस्वाद घेतला.युवा नेते दिपकभाऊ मधुकर भोंडवे व भाजपाचे नेते लहुमामा शेलार यांनी सर्वाना संबोधीत केले.यावेळी युवा नेते संतोष भोंडवे,आण्णा क्षेञे,राजु आण्णा पावाडे,रामु पावाडे,उषाताई राजु पावाडे,अनुजाताई रामु पावाडे,महालक्ष्मी केशव पावाडे,अजय शिंदे,आबा तरस,दिपक राऊत, हस्तोडिया,विनोद लोंढे,अतुल घोडगे, बारटक्के,प्रकाश घोलप,अशोक साबळे,अभिजित घुले,आबाजी घुले आदि.पादाधिकारी कार्येकते उपस्थित होते.