Home ताज्या बातम्या देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर पहिल्याच निवडणूकीत राष्र्टवादीची एक हाती सत्ता.

देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर पहिल्याच निवडणूकीत राष्र्टवादीची एक हाती सत्ता.

0

देहू,दि.19 जानेवारी 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर पहिल्यादाच निवडणूक पार पडली.देहू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकी पार पडल्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत 17 पैकी 14 जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने बहुमताने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीने काॅंग्रेस ने एक हाती सत्ता मिळवली. भारतीय जनता पक्षाला एक जागेवर विजय मिळाला तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले. अशा प्रकारे एकहाती सत्ता निवडणुकीच्या निकालामुळे आमदार सुनिल शेळके यांचे मावळ तालुक्यात वर्चस्व पुन्हा दिसून आले आहे.मावळ तालुक्यातील ग्राम पंचायती नंतर देहु नगरपंचायत एक हाती विजय मिळवल्याने जवळच पिंपरी चिंचवड मनपा वर सुद्धा राष्र्टवादी विजयाकडे वाटचाल करणार अशी चर्चा रंगली,निकालानंतर विजयी उमेदवारांनी भंडारा उधळत गावातून मिरवणूक काढली. पुण्याचे प्रांताधिकारी संजय देशमुख निवडणुक अधिकारी होते. नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.प्रशांत जाधव,तहसिलदार गीता गायकवाड,नायब तहसिलदार प्रविण ढमाले यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम काज पाहिले.

देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर पहिल्यादांच निवडणूक झाल्याने पहिला नगराध्यक्ष आणि नगरसेवक होण्याचा मान आपल्याला मिळावा,यासाठी 17 प्रभागांतून एकूण 82 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजप,शिवसेना आणि कॉग्रेसने पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली.तसेच तिकिट न मिळाल्याने अपक्ष उमेदवारांची संख्याही जास्त होती. मात्र आमदार सुनिल शेळके आणि मावळ तालुक्यातील नेते मंडळी देहूत संपुर्ण निवडणुकीत तळ ठोकून होते. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसला एकहाती सत्ता मिळाली संपुर्ण मावळ तालूक्यात आणि देहुनगरीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.विजयी उमेदवारांचे आमदार सुनिल शेळके,शहराध्यक्ष प्रकाश हगवणे यांना अभिनंदन केले.

प्रभागानुसार निकाल

प्रभाग क्रमांक 1- राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मिना कुऱ्हाडे यांना 618 मते मिळाली. तर भाजपचे नरेंद्र कोळी यांना 217 मते मिळाली. मिना कुऱ्हाडे या 421 मतांनी विजयी झाल्या.

प्रभाग क्रमांक 2 – राष्ट्रवादी कॉग्रेसच्या रसिका काळोखे यांना 733 मते मिळाली. तर भाजपचे शितल मराठे यांना 181 मते मिळाली.

प्रभाग क्रमांक 3- राष्ट्रवादी कॉग्रेसचे पुजा दिवटे यांना 372 मते मिळाली.तर शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, भाजपच्या प्रतिक्षा जाधव यांना प्रत्येकी 103 मते मिळाली.

प्रभाग क्रमांक 4 – राष्ट्रवादी कॉग्रेसचे मयुर शिवशरण यांना 289 मते मिळाली. तर भाजपचे प्रणव कसबे यांना 171मते मिळाली.

प्रभाग क्रमांक 5 – अपक्ष महिला उमेदवार शीतल काळोखे यांना 256 मते मिळाली. भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम काळोखे यांना 151 मते,राष्ट्रवादी कॉग्रेसचे अभिजित काळोखे यांना 172 मते पडली.

प्रभाग क्रमांक 6 – राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पूनम काळोखे यांना 467 मते मिळाली. तर भाजपच्या योगिता काळोखे यांना 266 मते मिळाली.

प्रभाग क्रमांक 7 – अपक्ष उमेदवार योगेश काळोखे यांना 650 मते मिळाली. तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे विकास कंद यांना 569 मते मिळाली.

प्रभाग क्रमांक 8- भाजपच्या पूजा काळोखे यांना 307 मते मिळाली.तर शिवसेनेच्या अक्षता कंद यांना 214 मते मिळाली. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या रत्नमाला करंडे यांना 115 मते पडली.

प्रभाग क्रमांक 9- राष्ट्रवादी कॉग्रेसच्या स्मिता चव्हाण यांना 568 मते मिळाली. तर भाजपच्या स्वाती चव्हाण यांना 235 मते मिळाली.

प्रभाग क्रमांक 10- राष्ट्रवादी कॉग्रेसचे सुधीर काळोखे यांना 571 मते मिळाली. तर भाजपचे पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास गोलांडे यांना 80 मते मिळाली.

प्रभाग क्रमांक 11- राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पौर्णिमा परदेशी यांना 288 मते मिळाली. तर भाजपच्या अनिता मोरे यांना 243 मते मिळाली.

प्रभाग क्रमांक 12 – राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सपना मोरे यांना 360 मते मिळाली. तर भाजपच्या सिंधू मोरे यांना 204 मते मिळाली.

प्रभाग क्रमांक 13 – राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रियांका मोरे यांना 625 मते मिळाली. तर भाजपच्या अनिता मुसुडगे यांना 97 ते मिळाली.

प्रभाग क्रमांक 14 – राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रविण काळोखे हे अवघ्या सात मतांनी विजयी झाले.त्यांना 318 मते मिळाली.तर अपक्ष उमेदवार आनंदा काळोखे यांना 311 मते मिळाली. शिवसेनेचे सुनिल हगवणे यांना 134 मते पडली.

प्रभाग क्रमांक 15- राष्ट्रवादी कॉग्रेसचे आदित्य टिळेकर यांना 630 मते मिळाली.तर भाजपचे  अ‍ॅड.प्रफुल्ल टिळेकर यांना 395 मते मिळाली.

प्रभाग क्रमांक 16 – राष्ट्रवादी कॉग्रेसचे योगेश परंडवाल यांना 503 मते मिळाली.तर भाजपचे प्रदुम्न टिळेकर यांना 182,अपक्ष सचिन विधाते यांना 228 मते मिळाली.

प्रभाग क्रमांक 17 – राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ज्योती टिळेकर यांना 475 मते मिळाली.तर अपक्ष उमेदवार सुनिता टिळेकर यांना 262 मते पडली.

Previous articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी – बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये
Next articleखासदार श्रीरंग बारणेंनी शहरात राजमाता जिजाऊंचा पुतळा उभारण्याचे आश्वास बाबा कांबळे यांच्या शिष्टमंडळला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 1 =