पुणे,दि.26 डिसेंबर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम मध्ये आयोजित “आदित्य पदाधिकारी संवाद” कार्यक्रमात युवासेना प्रमुख मा.श्री.आदित्य जी ठाकरे (पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते आपल्या सर्वांचे लाडके भावी नगरसेवक गंगाधर(आण्णा) बधे यांच्या स्व दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन करण्यात आले. या वेळी निलमताई गोऱ्हे (उपसभापती विधान परिषद), सचिन भाऊ अहिर (संपर्क प्रमुख पुणे ज़िल्हा), अदित्यजी शिरोडकर (सहसंपर्क प्रमुख पुणे ज़िल्हा),श्रीरंग /आप्पा बारणे(खासदार), माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे, शहर प्रमुख संजय मोरे, जिल्हा प्रमुख विजय देशमुख, तानाजी लोणकर तसेच हडपसर मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक सह नगरसेवक गंगाधर(आण्णा) बधे मिञ परिवार उपस्थित होता.