पिंपरी,दि. 24 डिसेंबर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे देशातील फायद्यात असणारे सार्वजनिक उद्योग विकायला काढले आहेत. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड भाजपा सत्ताधार्यानी शहरातील सर्वसामान्य नागरीकांना आवश्यक असणा-या वैद्यकीय सेवेचे खासगीकरण करुन ठेकेदारांची पोटं भरण्याचा उद्योग करीत आहेत. शहरातील नागरीकांच्या करातून भोसरी सर्व्हे. क्र. 1 येथे सुसज्ज असे 100 बेडचे नविन भोसरी रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाचे सर्व काम पुर्ण झाले असून हे रुग्णालय पुर्ण क्षमतेने नागरीकांच्या सेवेसाठी ताबडतोब उपलब्ध करुन द्यावे. तसेच नविन भोसरी रुग्णालयाबाबत यापुर्वी मनपाच्या सर्व साधारण सभेत हे रुग्णालय ‘पीपीपी’ तत्वावर देण्याबाबत मंजूर केलेला ठराव कायमस्वरुपी विखंडीत करावा. अशी मागणी शहारातील नागरीकांच्या वतीने आपणास करीत आहोत. अन्यथा पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पञातुन दिला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची शुक्रावार दि.24 डिसेंबर रोजी सर्व साधारण सभा सुरु असताना डॉ. कैलास कदम यांनी प्रेक्षक गॅलरीत आपल्या समर्थकांसह उपस्थित राहून नविन भोसरी रुग्णालय ‘पीपीपी’ तत्वावर देण्याबाबत मंजूर केलेला ठराव कायमस्वरुपी रद्द करा आणि वैद्यकीय सेवेत सुधारणा करा अशा घोषणा दिल्या. तत्पुर्वी डॉ. कैलास कदम यांनी महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले, तसेच नविन भोसरी रुग्णालयाबाबत यापुर्वी मनपाच्या सर्व साधारण सभेत हे रुग्णालय ‘पीपीपी’ तत्वावर देण्याबाबत मंजूर केलेला ठराव कायमस्वरुपी विखंडीत करावा. अशी मागणी शहारातील नागरीकांच्या वतीने आपणास करीत आहोत. अन्यथा पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. माजी मंत्री स्व. रामकृष्ण मोरे यांनी दुरदृष्टी ठेऊन शहरातील सर्वात मोठे 750 बेडचे वायसीएम रुग्णालय उभारले. या रुग्णालयातून आतापर्यंत लाखो रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. शहरातील वाढत्या लोकसंख्येची गरज पाहून मनपाचे सर्वसामान्य नागरीकांच्या करातून आणखी काही रुग्णालय उभारले यामध्ये सुसज्ज असे नविन भोसरी रुग्णालय आहे. या शंभर बेडच्या रुग्णालयात 90 बेड ऑक्सीजनसह आणि 10 बेड आयसीयुचे आहेत. येथे तीन ऑपरेशन थिएटर आहेत. लिक्वीड गॅस आणि ऑक्सीजन जनरेट प्लँट अशा अत्याधुनिक सुविधा देखील उभारण्यात आल्या आहेत. हे सर्वसामान्य नागरीकांच्या करातून उभारलेले रुग्णालय प्रशासन खासगी तत्वावर ठेकेदारांची पोटं भरण्यासाठी देत आहे. ज्या नागरीकांनी घाम गाळून, कष्ट करुन कर भरले आहेत आणि भाजपाच्या भुलथापांना बळी पडून ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिले आहे. त्यांच्याशी हि प्रतारणा केल्यासारखे आहे. नागरीकांना प्राथमिक वैद्यकीय सेवा सुविधा देणे हि प्रशासन आणि लोक प्रतिनिधी प्रमुख म्हणून तुमची प्रथम जबाबदारी व कर्तव्य आहे असेही पत्रात म्हटले आहे.