Home ताज्या बातम्या नाटक पाहून सकारात्मक ऊर्जा घेऊन जावू या – भारत जाधव

नाटक पाहून सकारात्मक ऊर्जा घेऊन जावू या – भारत जाधव

0

पिंपरी,दि.२२ डिसेंबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा रौप्य महोत्सव संपन्न दि. २० डिसेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांनी कोरोना काळातील नैराश्य बाजूला ठेवून नाटक पहायला यावे. नाटक पाहून सकारात्मक ऊर्जा घेऊन जावू या. भाऊसाहेब भोईर यांनी माझा आचार्य अत्रे पुरस्कार देऊन गौरव केला आहे आणि त्याच ठिकाणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात मला आचार्य अत्रेंचे नाटक करायची संधी मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे असे प्रतिपादन नाट्य कलाकार भरत जाधव यांनी केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त चिंचवडमध्ये प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवाच्या उद्‌घाटन प्रसंगी भरत जाधव बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ रंगकर्मी नंदकिशोर कपोते, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्याध्यक्ष रवीकांत वरपे, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, तळेगाव दाभाढे शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, शिरूर शाखेच्या अध्यक्षा दिपालीताई (माई) शेळके, कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, दौंड शाखेचे अध्यक्ष प्रमोद कांबळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राष्ट्रवादी युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप आदी उपस्थित होते. या नाट्य महोत्सवाअंतर्गत आचार्य अत्रे लिखित ‘मोरुची मावशी’ आणि संकर्षण कर्‍हाडे लिखित व अभिनेते प्रसाद ओक दिग्दर्शित ‘तू म्हणशील तसे’ या नाटकाचा प्रयोग सादर झाला.

यावेळी भरत जाधव म्हणाले की, सलग २५ वर्षे नाट्य परिषदेची संस्था चालविणे सोपे काम नाही. भाऊसाहेब भोईर यांनी या काळात अनेक ज्येष्ठ, दिग्गज कलाकारांना शहरात आणून त्यांचा गौरव केला तसेच अनेक मोठ्या कलाकारांना ऐकण्याची, त्यांची कला पाहण्याची संधी शहरातील प्रेक्षकांना दिली. कोरोनामुळे सर्वच व्यवसाय अडचणीत आले होते. तसेच नाट्य व्यवसाय, बॅक स्टेज आर्टिस्ट अडचणीत आले होते. आम्ही गोव्यासह महाराष्ट्राचा दौरा करत आहोत. सर्वत्र प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी चिंचवड मधील प्रेक्षकांनी देखील नाटकाचे प्रयोग पहावेत. नाटकातून सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढे जावे असेही आवाहन भरत जाधव यांनी केले.


प्रास्ताविक करताना भाऊसाहेब भोईर म्हणाले की, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे उद्‌घाटन ८ ऑगस्ट १९९६ रोजी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते झाले. या वर्षी शाखेचा रौप्यमहोत्सव आणि पवारसाहेबांचा ८१ वा वाढदिवस दरम्यान साजरा होत आहे हा एक सुखद आणि आनंदी योगायोग आहे. या काळात अनेक ज्ञात, अज्ञात व्यक्ती, संस्थांनी ही संस्था वाढविण्यास हातभार लावला. रौप्य महोत्सवी वर्षात त्यातील प्रातिनिधीक माध्यम प्रतिनिधी, सांस्कृतिक व सामाजिक संस्था, कलाकार व्यक्ती अशा सुमारे १५० जणांना सन्मान चिन्हे देऊन गौरविण्यात संस्थेला अभिमान वाटत आहे.


या प्रयोगांआधी पत्रकार प्रतिनिधी, विविध संस्था प्रतिनिधी व कलाकार व्यक्ती यांचा गौरव भरत जाधव, संकर्षण कर्‍हाडे आणि मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये पुणे, तळेगांव दाभाडे, शिरुर, दोंड, पुणे व मुंबई येथील नाट्यपरिषद शाखा, पिंपरी चिंचवड शाखेचे कार्यकारिणी सदस्य यांचाही समावेश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिषदेच्या गेल्या २५ वर्षांतील कार्याचा आढावा घेणारी आणि शरद पवार साहेबांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक योगदानाचा आलेख दर्शविणा-या चित्रफिती दाखविण्यात आल्या. तसेच कैलास भिंगारे यांच्या सहाय्याने परिषदेच्या २५ वर्षांतील सुवर्ण क्षणांच्या आठवणींची छायाचित्रे आणि शरद पवार साहेबांच्या आजवरच्या राजकीय प्रवासातील उद्‌बोधक छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली होती.संकर्षण कऱ्हाडे यांनी ही प्रेक्षकांशी संवाद साधला.कार्यक्रमाच्या संयोजनात सुहास जोशी, किरण येवलेकर, नरेंद्र आमले, जयराज काळे, संतोष शिंदे, राजेंद्र बंग, संतोष रासने गौरी लोंढे, रुपाली पाथरे, सुदाम परब, राहुल भोईर, रवींद्र यंगड, व सागर मोरे, गणेश कांबळे यांनी सहभाग घेतला होता.

Previous articleसर्व नागरीकांच्या चेहर्‍यावरचा आनंद ह्याच मला वाढदिवसाच्या खर्‍या शुभेच्छा ठरल्यात – दिपक भोंडवे
Next articleनगरसेवक पद रद्द करण्याचा आधिकार विभागीय आयुक्तांना नाही- राष्ट्रवादीच्या नगरसविका डॉ .सुलक्षणा शिलवंत – धर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − twelve =