Home ताज्या बातम्या सर्व नागरीकांच्या चेहर्‍यावरचा आनंद ह्याच मला वाढदिवसाच्या खर्‍या शुभेच्छा ठरल्यात – दिपक...

सर्व नागरीकांच्या चेहर्‍यावरचा आनंद ह्याच मला वाढदिवसाच्या खर्‍या शुभेच्छा ठरल्यात – दिपक भोंडवे

0

किवळे-रावेत,दि.21 डिसेंबर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- रावेत गाव येथील युवा नेते दिपक मधुकर भोंडवे यांचा वाढदिवस माई बालभवन अंध-संस्थेतील मुला-मुली सोबत दि.14 डिसेंबर 2021 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी लहान मुलांसाठी बालजत्रा आणि खाऊ गल्ली चे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाला रावेत किवळे मामुर्डी विकास नगर परिसरातील बालक आणि पालक यांचा उत्तम प्रतिसाद लाभला दरम्यान कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार्‍या अभिनेत्री ईशा केसकर यांच्या उपस्थितीने या वाढदिवस सोहळ्याची रंगत आणखी वाढली,किवळे गावातील मुकाई चौक,आदर्श नगर येथे हा कार्यक्रम पार पडला. पिंपरी चिंचवड महापालिका सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके तसेच विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्यासह अन्य नगरसेवक व सर्वपक्षीय दिग्गज मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त दिपक भोंडवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली.यावेळी विजय पानसरे प्रस्तुत “सलाम इंडिया” हा संगीतमय गाण्याचा कार्यक्रम पार पडला, रावेत किवळे परिसरातील लहान मुलांसाठी बाल जत्रा तसेच खवय्यांसाठी खाऊ गल्ली कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले कार्यक्रमादरम्यान माई बालभवन येथील अंध मुला-मुलींचे सबसे साठी दिपक भोंडवे यांच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली तसेच या संस्थेतील दृष्टिहीन मुला मुली सोबत दीपक भोंडवे यांनी वाढदिवसाचा केक कापला,कोरोनाच्या सावट सर्व ठिकाणी असताना कोणी बाहेर येत नव्हते कार्यक्रम घेत नव्हते माञ आता कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर वाढदिवसाचे निमित्त साधुन हा कार्यक्रम घेतला,त्यामुळे सर्व आलेल्या नागरिकांन मध्ये आनंदाचे वातावरण होते,सर्व नागरीकांच्या चेहर्‍यावरचा आनंद ह्याच मला वाढदिवसाच्या खर्‍या शुभेच्छा ठरल्यात व अशीच साथ सोबत शेवट पर्यंत असावी असे मत दिपक भोंडवे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संयोजन संदीप काळोखे, अमोल कालेकर, अशोक करमारे, प्रशांत कुंभार, निखिल जाधव, वैभव देशमुख, अशोक काळे आदी.पदाधिकारी व दिपक भोंडवे मिञ परिवाराने केले.

Previous articleत्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा स्वतंत्र जागेवर उभारण्यात येईल असा निर्णय महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी जाहीर केला
Next articleनाटक पाहून सकारात्मक ऊर्जा घेऊन जावू या – भारत जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − sixteen =