थेरगाव,दि.22 ऑक्टोंबर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- थेरगांव येथील नवीन रूग्णालयाला भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. थेरगांव येथे महानगरपालिकेच्या एकाही वास्तूला मिळकतींना डॉ .बाबासाहेबांचे नाव नाही .थेरगांव मध्ये मोठया प्रमाणात दलित , मागासवर्गीय , ओबीसी , मुस्लीम समाज राहतो . त्यांची सर्वांची ही हिच मागणी आहे . त्यामुळे महापालिकेच्या थेरगांव येथील नवीन रूग्णालयाला एखादया गल्ली बोळातल्या नेत्याचे नाव देण्यापेक्षा महापुरूष भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे . जेणे करून महापुरुषांची आठवण स्मरणात राहिल . म्हणून आयुक्त साहेब आपण थेरगांव येथील महापालिकेच्या नवीन रूग्णालयाला भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे असे विनंती पञ थेरगावचे सामाजीक कार्यकर्ते बाबर चांद शेख यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.ततस्म बहुजन समाजातुन सर्व जातीय समुहातुन हि मागणी होत आहे,तुरळ राजकीय व्यक्ती सोडल्यास त्यामुळे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊन आयुक्त साहेब थेरगावच्या जनतेला न्याय देतील की त्या साठी थेरगावच्या जनतेला इथपण संघर्ष करावा लागेल या कडे सर्व शहराच लक्ष लागुन आहे.
Home ताज्या बातम्या थेरगांव येथील नवीन रुग्णालयाला भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी