पिंपळेनिलेख,दि.१८ ऑक्टोबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राष्ट्रवादीच्या सर्वासर्वे नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा पिंपरी-चिंचवड शहरात दौरा झाला व त्यांनी कार्यकर्त्यांना उभारी मिळावी यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी नवरणनीती नियुक्त मार्गदर्शन केले.मात्र पवार साहेब यांच्या उपस्थितीत कोणाही पक्षाचा व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला नाही.याची चर्चा शहरभर पसरली त्यावर अनेक नेत्यांनी राष्र्टवादीला अजुन संधी मिळणार अशी चर्चा जोर धरु लागली,पवार साहेबांनी चिंचवड आणि भोसरी विधानसभेचे आमदारांवर नाव न घेता टिकास्त्र सोडले, राष्ट्रवादीला साथ द्या नक्कीच बदल घडेल असे बोलले.माञ आधीही आणि अद्यापही दोन्ही आमदारांच्या विरोधात कोणत्याही पक्षाचा नगरसेवक व पदाधिकारी बोलायला तयार नाही त्यातच जे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना व पदाधिकार्यांना जमलं नाही ते भाजपचे नगरसेवक तुषार कामटे यांनी करून दाखवले चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांच्यामुळे भारतीय जनता पार्टी ला खूप मोठे नुकसान सोसावे लागणार आशा आशयाचे पञ मा.मुख्यमंञी व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पाठवले आहे.त्यामुळे संपुर्ण शहरात खळबळ उडाली,भाजपच्याच नगरसेवकांनी घरचा आहेर दिला आहे.
येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवण्याचा भाजपच्या सर्वांचाच मानस आहे. पण गेल्या ५ वर्षांमध्ये शहरातील भाजपचे दोन्ही आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या अनेक चुकीच्या कामांमुळे येत्या निवडणुकांमध्ये भाजपाला याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे,असे सुचक विधान पञातुन केले आहे.या आमदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे खापर विरोधी पक्ष व जनता महापालिकेतील आपल्या नगरसेवकांवर फोडणार हे निश्चित. लांडगे व जगताप यांनी शहरात मनमानी व हुकूमशाही पद्धतीने महापालिकेत हस्तक्षेप करत अनेक नगरसेवकांना त्रस्त केले आहे. त्यामुळे आपल्याच पक्षातील काही नगसेवक यांच्या कारभारावर नाराज आहेत. तरी आपण येत्या महापालिका निवडणुक तिकीटवाटपाच्या संदर्भात लांडगे गट किंवा जगताप गटाचा समर्थक, नातेवाईक किंवा स्नेही म्हणून निर्णय न घेता भाजपच्या मेहनती सर्वसामान्य सच्च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी अशी विनंती माजी मुख्यमंञी,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पञा द्वारे भाजपा नगरसेवक तुषार कामटे यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांकडून कामटे भाजपच्या आमदारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजप पक्ष सोडणार असल्याची चर्चा सध्या शहरात चालू आहे. पण कामटे यांनी भाजपच्या कोणत्याही आमदाराच्या गटातील म्हणून नव्हे तर भाजपचा एक सच्चा शिलेदार म्हणून काम करतो आहे. असे मत पञात व्यक्त केले आहे. ज्या दोन आमदारांनी चुकीची कामे केली आहेत ते कदाचित स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पक्षाचा त्याग करू शकतात, तशी शक्यताही सध्या वर्तवली जात आहे. पण कामटे भाजपच्या विचारांनी प्रेरित असुन समाजकारण करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता व कायम पक्षाशी एकनिष्ठ राहणार कार्यकर्ता असून पक्षाचे होणारे नुकसान पाहू शकत नाही,अशी जहरी टिका हे दोन्ही आमदारांवर केली आहे, वेळ प्रसंगी पक्ष बदलतील परंतु नवीन कार्यकर्ता केव्हा ही पक्ष बदलू शकत नाही अशी खंत व्यक्त केली.
नगरेसेवक तुषार कामटे यांच्या विनंतीचा देवेंद्र फडणवीस वरिष्ठ नेते सकारात्मक विचार करून काय निर्णय घेतील या कडे संपुर्ण शहराचे लक्ष लागुन आहे.तशी चर्चा हि भाजपा साहित सर्व पक्षात रंगली असून पक्षाचे हासु होणार असे स्पष्ट चिन्ह दिसत आहेत.